-->

Ads

जालना बांग्लादेशातील हिंदूंना सुरक्षा द्या,जिल्हाधिकारी कार्यालयासमोर किर्तन प्रदर्शन.


बांग्लादेशातील हिंदु मंदिरं, हिंदू धर्माचे लोक असुरक्षित झाले आहेत.त्यामुळे त्यांना सुरक्षा द्या,या मागणीसाठी आज जालन्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर इस्कॉन संघटनेसह हिंदुत्ववादी संघटनांनी किर्तन प्रदर्शन करून हिंदूंवर झालेल्या अत्याचाराचा जाहीर निषेध नोंदवला.बांग्लादेशात हिंदूंवर अत्याचार सुरु असून त्यांच्या मानवाधिकारावर गदा आणली जात आहे.त्यामुळे तेथील सरकारने हिंदू देवस्थानं आणि हिंदूंना सुरक्षा द्यावी,झालेल्या नुकसानीची भरपाई द्यावी,यापुढे अशा घटना होऊ नये म्हणून तेथील सरकारने काळजी घ्यावी अशी मागणी इस्कॉनच्या वतीने संयुक्त राष्ट्र संघटनेकडे केली असून त्यांनी हस्तक्षेप करण्याचं मान्य केल्याचं देखील आंदोलकांनी म्हटलंय.बांग्लादेशातील हिंदूंना त्रास देणं हा कट असल्याचा आरोप देखील आंदोलकांनी केला.


बाईट - रास गोविंददास  ( प्रबंधक इस्कॉन )

Post a Comment

0 Comments