-->

Ads

महावितरणचे विज तोडणी विरोधात चोपड्यात शेतकर्‍यांचे रास्ता रोको आंदोलन.




जळगाव चोपडा तालुक्यात अतिवृष्टी अवकाळी पाऊस  व सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झालेले आहे त्यात महावितरण विभागाने थकीत असलेल्या शेती पंप धारक शेतकऱ्यांकडून वसुलीचा तगादा लावला आहे विज बिल न भरल्यास शेती पंपाचे कनेक्शन कट केले जात आहे या महावितरण च्या वीज तोडणी विरोधात व मागील खोटी अवास्तव विज बिल माफ करून यापुढे अश्वशक्ति वर आधारित विज बिल आकारावी या प्रमुख मागणीसाठी ब-हाणपुर अंकलेश्वर हायवे वरती चोपडा शहरातील नगरपालिकेच्या उद्यानाजवळ शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केले यावेळी महावितरण व राज्य सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली त्यानंतर तहसील कार्यालयात धरणे आंदोलन करण्यात आले तहसीलदार अनिल गावित यांनी आपल्या भावना वरिष्ठांपर्यंत पोचविण्यात येतील त्यासाठी काही वेळ द्यावा त्यानंतर काही मार्ग निघतो का ते पाहू या आश्वासन दिलेल्या नंतर आंदोलकांनी आंदोलन थांबवलं यावेळी शेतकरी कृती समितीचे एस बी पाटील अनिल वानखेडे आत्माराम माळके प्रदीप पाटील अमृत महाजन डाँ रवींद्र  निकम किरण गुजर भागवत पाटील प्रदीप पाटील यांच्यासह तालुक्यातील शेतकरी उपस्थित होते.


बाईटः एसबी पाटील ,डॉ.रविंद्र निकम, किरण गुजर.


उमेश नगराळे चोपडा जळगाव.

Post a Comment

0 Comments