-->

Ads

सिंधुदुर्ग जिल्हा मुख्यालय प्राथमिक शिक्षक भरतीचे विविध मागण्यांसाठी जिल्हा परिषद समोर लाक्षणिक धरणे




शैक्षणिक कामकाजासाठी शिक्षकांना कोविड-१९ ड्युटीतुन कार्यमुक्त करावे, आंतर जिल्हा बदली शिक्षकांना तात्काळ कार्यमुक्त करावे, अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करावे, खुल्या प्रवर्गातील सर्व विद्यार्थ्यांना जिल्हा परिषद स्वनिधीतून गणवेश पुरविण्यात यावा. यासह विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भारती, शाखा सिंधुदुर्ग च्या वतीने आज जिल्हा परिषदेसमोर एक दिवसीय लक्षवेधी आंदोलन छेडण्यात आले.

जिल्ह्यातील शिक्षकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांबाबत शिक्षणाधिकारी यांच्याशी वेळोवेळी चर्चा व निवेदने देऊनही अद्यापही शिक्षकांचे प्रश्न प्रलंबित राहिले आहेत. आज पर्यंत कोणत्याही प्रश्नाची सोडवणूक झालेली नाही. शिक्षकांच्या महत्त्वाच्या प्रश्नांकडे जिल्हा परिषद प्रशासनाकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष केला जात आहे अशी आमची धारणा झालेली असून या प्रलंबित प्रश्नाची प्रशासनाने दखल घ्यावी व शिक्षकांना न्याय मिळावा यासाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भारती संघटनेच्यावतीने संघटनेचे अध्यक्ष संतोष पाताडे, सरचिटणीस अरुण पवार यांच्या नेतृत्वाखाली आज जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारावर एक दिवशीय लक्षवेधी आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाच्या माध्यमातून विविध प्रश्‍नांकडे लक्ष वेधताना, शिक्षकांना शैक्षणिक कामकाजासाठी कोरोना ड्यूटीतून कार्यमुक्त करावे, सातत्याने विलंबाने होत असलेला पगार वेळेत मिळावा, आंतर जिल्हा बदली शिक्षकांना तात्काळ कार्यमुक्त करावे, वरिष्ठ वेतन श्रेणी प्रस्ताव मंजूर करावे, अंशदान हिशोभ तक्त्यातील तफावत दूर करावी, अभावित पद्धतीने पदोन्नती प्रक्रिया त्वरित राबवण्यात येउन पदवीधर, केंद्रप्रमुख व विस्तार अधिकारी यांची रिक्त पदे त्वरित भरण्यात यावीत, अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करावे, वेतन निश्चिती मधील त्रुटी दूर करून प्रस्ताव मंजूर करावेत, समग्र शिक्षा अभियानातून विशेष दुरुस्ती अनुदान मंजूर केलेला शाळांना दुसरा हप्ता व दुरुस्ती पूर्ण झालेल्या शाळांना अंतिम हप्ता विनाविलंब मिळावा, खुल्या प्रवर्गातील सर्व विद्यार्थ्यांना जिल्हा परिषद स्वनिधीतून गणवेश पुरविण्यात यावेत, शासनाच्या नवीन बदली धोरणानुसार करण्यात आलेल्या सुगम व दुर्गम क्षेत्रात येणाऱ्या शाळांची यादी  संख्येने  संघटनेचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

प्राथमिक शिक्षक भारती सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष संतोष पाताडे



Post a Comment

0 Comments