-->

Ads

बिटरगाव पोलीस स्टेशन चे ठाणेदार प्रताप भोस यांनी उचलला कोरोना लसीकरणाचा विडा

बिटरगाव पोलीस स्टेशन अतंर्गत येणाऱ्या प्रत्येक गावामध्ये ठाणेदार प्रताप भोस हे लसीकरणा साठी घरोघरी जाऊन नागरीकांना कोरोना या रोगावर कसा आळा घालता येईल यासाठी जनजागृती करुन नागरीकांना लस घेण्यास प्रवृत्त केले या लसीकरणाला ढाणकी निगंणुर बिटरगाव या गावामध्ये भरभरून प्रतिसाद मिळत आहे या साठी जणु ठाणेदार प्रताप भोस यांनी लसीकरणाचा विढा च उचलला असे पहावयास मिळत आहे ठाणेदार प्रताप भोस यांची लसीकरणा साठी धडपड पाहुन ग्रामीण भागातील जनतेचे लसीकरणा साठी मनोबल वाढत 

आहे या मोहिमेला आरोग्य विभाग महसुली विभाग पंचायत विभाग हे अहोरात्र मेहनत घेत आहेत या परिसरात शंभर टक्के लसीकरण करून शासनाला सहकार्य करून कोरोना ला हद्दपार करु असा मानस ठाणेदार प्रताप भोस यांनी केला आहे  निगनुंर या गावामध्ये एका दिवसामध्ये लसीचा600 लोकांनी लाभ घेतला यावेळी बिटरगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रताप भोस. जिल्हा परिषद सदस्य पंकज मुडे. निंगणुर येथील सरपंच सुनील बर्डे.



 उपसरपंच. पोलिस पाटील उत्तम मुडे. महसूल विभागातील तलाठी कृषी सहाय्यक जे .यम. कदम सचिव जी. एस .चव्हाण, बीट जमदार गजानन खरात दत्ता कुसराम प्राथमिक उपकेंद्र आरोग्य अधिकारी आरोग्य सेविका नेताम , ब्रिजलाल मुडे उमरखेड तालुका उपाध्यक्ष काँग्रेस पार्टी. माजी उपसरपंच अंकुश राठोड, व पत्रकार प्रेस सेवा संघाचे तालुका अध्यक्ष मारुती गव्हाळे पत्रकार मैनोदीन सौदागर  गजानन नावडे निंगणुर ग्रामपंचायत सर्व सदस्य  उपस्थित होते

Post a Comment

0 Comments