उमरखेड प्रतिनिधी:- संजय जाधव आज चा दिवस बिटरगाव पोलीस स्टेशनं हद्दी साठी काळा दिवस ठरला असून एकाच दिवशी वेगवेगळ्या ठिकाणी तिघांनी आत्महत्या केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या तिन्ही आत्महत्या मुळे मरण स्वस्त होत असल्याचे दिसून येत आहे. जिवनात कोणतेही संकट आले कि, आता आत्महत्या हाच पर्याय युवा पिढीला दिसत असून हा चिंतेचा विषय आहे. या आधी सुद्धा ढाणकी येथे एका होमगार्ड ने तसेच एका युवतीने एकाच दिवशी आत्महत्या केली होती. त्यामुळे नव्या पिढीचे स
मुपदेशन करणे गरजेचे आहे. आजबिटरगाव पोलीस स्टेशन अंतर्गत व ढाणकी परिसरात आज आत्महत्या सत्र घडले ढाणकी येथील ज्ञानेश्वर ढोबळे वय 32 वर्ष या युवकाने कीटकनाशक पियुन आपली जीवन यात्रा संपविली तर ढाणकी जवळील खरुस खुर्द येथील सुभाष बदू राठोड वय 55 वर्ष यांनी गळफास घेतला. तसेच निंगनूर येथील प्रेम जाधव वय 40 वर्ष याने सुद्धा गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. परिसरात एकाच दिवशी तीन आत्महत्या घडण्याची ही पहिलीच वेळ असून या मुळे सर्वत्र शोककळा पसरली आहे. आत्महत्येचे कारण अद्याप कळाले नसून तपास बिटरगाव पोलीस स्टेशनं पोलीस निरीक्षक प्रताप बोस उपनिरीक्षक कपिल मस्के यांच्या मार्गदर्शनाखाली बीट जमदार गजानन खरात पोलीस कॉस्टेबल दत्ता कुसराम तपास सुरू आहे
0 Comments