-->

Ads

फुलसावंगी येथील तलाठ्याला मुख्यालयाचे वावडे.. एका कामासाठी पहावी हप्ताभराची वाट, शेतकऱ्यांमधुन रोष..



          महागाव : महागाव महसुल विभागा अंतर्गत येत असलेल्या फुलसावंगी येथे तलाठी साझा नं.८० आहे. फुलसावंगी हे महसुल विभागाचे मंडळ आहे. येथे एक मंडळअधिकारी व मंडळा अंतर्गत येत असलेल्या तलाठ्यांनी राहने अनिवार्य मात्र येथे मुख्यालयी कोणीही राहत नाही. याचा नाहक त्रास शेतकरी बांधवांना होत असुन एका कामासाठी शेतकऱ्यांना हप्ता हप्ता वाट पाहवी लागत असल्याने शेतकरी बांधकडुन रोष व्यक्त होत आहे.

           फुलसावंगी महसुल मंडळा अंतर्गत राहुर,शिरपुली, शिरमाळ,काळी, टेंभी, चिल्ली, चिंचोली ,पिंपळगाव, वरोडी व वडद या गावाचा समावेश होतो. या गावातील शेतक ऱ्यांनी स्वःची कामे सोडुन तलाठ्याच्या शोधात तालुक्याच्या ठिकाणी जावे लागते. येथे कार्यरत असलेले तलाठी पुसद व यवतमाळ येथुन अपडाऊन करतात. त्यामुळे सर्व सामान्य नागरिकाची अनेक महत्वाची कामे खोळंबतात. 

            शेतकरी आपल्या शेतात विविध पिकाची लागवड करतात. मात्र त्या पिकाची नोंद तलाठ्याकडून घेतली जात नसल्याची ओरड होती. त्यामुळे शासनाने 'माझी शेती, माझा सातबारा,  मी नोंद विनार पिकांचा पेरा ' ही हे अभियान राबविले आहे.यामध्ये शेतकऱ्यांना खुप अडचणीचा सामना करावा लागला. मात्र फुल सावंगी महसुल मंडळा कडुन शेतकऱ्यांना कोणतेही मार्गदर्शन केले नसल्याची ओरड शेतकरी बांधवा मधुन होत आहे.

       एकंदरीतच तलाठीच मुख्यालयी राहत नसल्यामुळे शेतकऱ्यांची अनेक महत्वाची कामे खोळंबली जात आहे. या गंभीर बाबीकडे जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज आहे.

महागाव प्रतिनिधी :- संजय जाधव

Post a Comment

0 Comments