-->

Ads

श्रीहरी सुपर मार्केट चे खासदार हेमंत पाटील यांच्या हस्ते उदघाटन


उमरखेड : स्वतःचे कौशल्य वापरून युवकांनी उद्योग व्यवसाय सुरु करावेत . युवकांनी उद्योगाची कास धरून कार्य केल्यास अर्थव्यस्थेला गती मिळेल असे प्रतिपादन खासदार हेमंत पाटील यांनी केले . उमरखेड येथे श्रीहरी सुपर मार्केटच्या उदघाटनप्रसंगी खासदार हेमंत पाटील बोलत होते .
        

 उमरखेड येथे माने कुटुंबाच्या वतीने श्रीहरी सुपर मार्केट ची सुरवात केली या सुपर मार्केटच्या उदघाटन खासदार हेमंत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले . या उदघाटन कार्यक्रमाला आ. इंद्रनील नाईक,आ.नामदेव ससाणे,  , माजी आ. नागेश पाटील आष्टीकर , माजी आ. विजय खडसे, जि.प. सदस्य चितांगराव कदम गुरुजी , पुसद अर्बनचे अध्यक्ष शरद मैद , शिवाजी शिक्षण संस्थचे सचिव अनिरुद्ध चौंढेकर , व्यापारी संघटनेचे अध्यक्ष नारायण भट्टड , उमरखेड बार कौन्सिल चे अध्यक्ष आशिष देशमुख, पोलीस निरीक्षक अमोल माळवे ,जिल्हा परिषद उपाद्यक्ष क्रांती कामारकर,भाजपा जिल्हा प्रमुख नितीनजी भुतडा,काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस तातूभाऊ देशमुख,अर्थ व बांधकाम सभापती राम देवसरकर,पंचायत समिती सभापती प्रज्ञानंद खडसे, श्रीहरी सुपर मार्केटचे शिवाजी माने , कल्याण माने , अक्षय माने, आकाश माने , डॉ. विजय माने , डॉ. राजेश माने , यांची प्रमुख उपस्थिती होती .यावेळी बोलताना खासदार हेमंत पाटील म्हणले कि, आजच्या तरुण पिढीने मृगजळाच्या मागे न लागता स्वतःचा उद्योग व्यवसाय उभाराव यामुळे समाजातील इतर घटकांना सुद्धा रोजगार उपलब्ध होऊ शकेल तरुण उद्योजक मराठी तरुणांनी पुढे येऊन उद्योग व्यवसायात भरभराट करावी . 

      कार्यक्रमाला शिवसेना उपजिल्हाप्रमुख बळीराम मुटकुळे,  उपजिल्हा संघटक राजेश खामनेकर , माजी उपजिल्हाप्रमुख के. के. कदम , जेष्ट शिवसैनिक अनिल नरवाडे,अजय नरवाडे,तालुका प्रमुख सतीश नाईक , शहर प्रमुख संदीप ठाकरे,न.प.उपाद्यक्ष अरविंद भोयर,सभापती अमोल तीवरंगकर,शिवाजी रावते,युवासेना प्रमुख कपिल चव्हाण,तालुका समन्वयक रवी रुडे, राहुल सोनोने, बालाजी  लोखंडे,  यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते .

Post a Comment

0 Comments