-->

Ads

उमरखेड जुगार खेळणाऱ्यांवर दराठी पोलिसांची धाड



उमरखेड प्रतिनिधी :- संजय जाधव

१२ ऑक्टोंबर प्रतिनिधी: बंदी भागातील दराटी पोलीस स्टेशन हे अतिदुर्गम भागात असून ठाण्याचे नवीन ठाणेदार भरत चपाईतकर यांनी पदभार स्वीकारताच धडक कारवाईद्ध करण्यास सुरवात केली आहे.


दराटी पोलीस स्टेशनं अंतर्गत येत असलेल्या अमडापूर डॅम येथे काही लोक अवैध जुगार खेळत असल्याची माहिती ठाणेदार चपाईतकर यांना मिळाली, मिळालेल्या माहितीच्या आधारे आपल्या सहकार्यांना घेऊन त्यांनी वेषांतर केले व खासगी छोटा हाथी या वाहनाने ते अमडापूर डॅम येथील जेथे जुगार चालु आहे तेथे धडकले. व हारजितीचा खेळ खेळत असलेल्या सहा जुगारी शेख कलीम शेख चांद, सदाम खान, फकिरा राठोड, शंकर कांबळे, ज्ञानेश्वर घावास, महेंद्र चौधरीयांना पकडले तर तीन जुगारी पळून जाण्यात यशस्वी झाले. आरोपी कडून ९९६० रुपये नगदी, ४३४०० किमतीचे सहा मोबाईल, ६५००० रुपये किंमत चे वाहने जप्त करण्यात आले आहे. आरोपीवर महाराष्ट्र जुगार कायद्यानुसार गुन्हा नोंद केला असून पुढील तपास पोलीस अधीक्षक डॉ दिलीप पाटील भुजबळ, उपविभागीय पोलीस अधिकारी आदित्य मिरखेलकर यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार भरत चपाईतकर करत आहेत. यावेळी उपनिरीक्षक अमोल राठोड, पोना संभाजी केंद्रे, यशवंत घुगे, रमण दहिफळे, वामन हेलगीर, संजय तारे, अमोल भगत, होमगार्ड ज्ञानेश्वर, अजय हे सुद्धा कारवाईत सहभागी होते. या कारवाईमुळे ठाणेदार चपाईतकर यांचे कौतुक होत होत आहे.

Post a Comment

0 Comments