-->

Ads

उमरखेड नागरी सुरक्षेसाठी जिल्ह्यातील सर्व आस्थापनांना आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण गरजेचे



यवतमाळ जिल्ह्यातील सर्व रुग्णालये व बँका टाळेबंदी(Lockdown) मध्येही सतत सुरु होत्या व आत्ताही सुरु आहेत.सोबतच जिल्ह्यातील सर्व उद्योग व कारखाने हि पूर्ण क्षमतेने सुरु करण्यात आले आहे व आत्ता शाळाही सुरु झाल्या आहेत. या सर्व सार्वजनिक ठिकाणी बऱ्याच प्रमाणात गर्दी पाहायला मिळते. या सर्व आस्थापनानमध्ये आपत्ती पासून बचाव करण्यासठी अग्निशमन यंत्रणा बसविण्यात आलेल्या आहे. परंतु या सर्व यंत्रणांचा योग्य वापर करण्याचे पुरेपूर ज्ञान तेथे कार्यरत असणाऱ्या बऱ्याच नागरिकांना नाही आहे. यामुळे भविष्यात एखाद्या मोठी आपत्ती होऊन त्यात जीवित व वित्तहानी होऊ शकते यासाठी अगोदरच या सर्व आस्थापनांमध्ये आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण होणे गरजेचे आहे. 


काही दिवसाअगोदर जिल्ह्यातील सर्व रुग्णालय, बँका व कारखाने छोटे-मोठे उद्योग येथील सर्व  अधिकारी व कर्मचाऱ्यांना आपत्ती व्यवस्थापनाचे अधिकृत प्रशिक्षक व तज्ञ यांच्याकडून आपत्ती व्यवस्थापनाचे प्रात्यक्षिकासह प्रशिक्षण घेणे बंधनकारक करावे अशी निवेदनाद्वारे मागणी राष्ट्र निर्माण व युवक कल्याण संघाच्या युवकांनी  व टार्गेट डिफेन्स अकॅडमीच्या  पदाधिकाऱ्यानी दिल्याचे वृत्त काही वृत्तपत्रांमधून प्रकशित झाली होती. त्या निवेदनाची दखल घेत, आपत्ती व्यवस्थापन क्षेत्रात मागील १६ वर्षापासून सतत कार्यरत असलेल्या तसेच आपत्ती व्यवस्थापनात कार्य करण्यासाठी अधिकृत व तज्ञ असलेल्या TDRF कडून सर्व शाळा, रुग्णालये, बँका,लहान-मोठे उद्योग अशा सर्व आस्थापनांनमध्ये कार्यरत असणाऱ्या सर्व अधिकारी – कर्मचारी व इतर नागरीकांना आपत्तीपासून सुरक्षित करण्यासाठी सर्व ठिकाणी त्या आस्थापनांचा कृती आराखडा सोबतच DRR प्लॅन तयार करून आपत्ती व्यवस्थापनाचे प्रात्यक्षिकासह प्रशिक्षण व रंगीत तालीम घेणे असे सर्व उपक्रम राबविण्यासाठी आदेशित करावे जेणेकरून आग लागणे, वीज पडणे, शॉट सर्किट होणे, प्रथमोपचार तसेच आपत्तीच्या वेळी इव्ह्याक्युव्हेशन करणे या सर्व आपत्ती व्यवस्थापनासाठी आवश्यक माहिती हि जिल्ह्यातील नागरिक, कर्मचारी,शिक्षक, कारखानदार, मजूर, व विद्यार्थी  यांच्यापर्यंत पोहोचेल व कोणत्याही आपत्तीच्या वेळी प्रशासकीय मदतीची वाट न बगता सर्व नागरिक स्वतः चा व नागरिकांचा जीव वाचवण्यासाठी सहाय्य करतील. याकरिता TDRF अधिकारी  व जवानांकडून जिल्हाधिकारी यांना प्रत्यक्ष भेटून व जिल्ह्यातील १६ हि तालुक्यातील तहसिलदारांना एकाच वेळी दि. ०६/१०/२०२१ रोजी निवेदन देण्यात आले.


सोबतच जिल्हा शल्य चिकित्सक, नगर परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांनाही त्यांच्या कार्यक्षेत्रात असणाऱ्या सर्व आस्थापनांना प्रशिक्षण घेणे बंधन कारक करावे अशी मागणी करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी यांना निवेदन दिल्यांनतर “लवकरच या सर्व आस्थापनांमध्ये प्रशिक्षण घेण्यास कळवू” असे  जिल्हाधिकार्यांनी सांगितले


यावेळी जिल्हाधिकारी यांना  TDRF बटालियन चे जिल्हा समादेशक अभिषेक राजहंस , यवतमाळ  तालुक्याचे कंपनी कमांडर शुभम बैस , TDRF जवान मोहित राठोड,मनीष जाधव, दर्शन जांभुळे, यश कन्नाके, यश गेडाम,तेजस्वी राठोड इ. अधिकारी व जवानांनी निवेदन दिले. सोबतच उमरखेड तालुक्यामध्ये कंपनी कमांडर सुरज सूर्यवंशी, ज्ञानेश्वर हिंगडे,ओमकार देवकते, त्रिशाला शिरगरे, योगिता भालेराव इ. TDRF अधिकारी व जवानांनी निवेदन दिले.

Post a Comment

0 Comments