शेतीसाठी जाणारा वहिवाटीचा रस्ता अडविल्याने तालुक्यातील चिंचोली येथील किसन तानु पवार आणि सुमनबाई किसन पवार या शेतकरी दाम्पत्याने आज आपल्या पशुधनास सह उपोषण मांडल्याने प्रशासनाची पुरतीच भांबेरी उडाल्याची घटना महागाव येथे घडली. तालुक्यातील चिंचोली येथील शेतकरी किसन तानु पवार या शेतकऱ्यांच्या शेतात जाणारा रस्ता शेजारी भुराजी कोकणे यांनी अडविल्याने या शेतकऱ्यांला शेती करणे व शेतात जाणे अवघड झाल्याने हा रस्ता मोकळा करून द्यावा ह्यासाठी पवार यांनी प्रशासनाकडे वारंवार तक्रारी केल्या. मात्र सुस्त प्रशासनाने पवार यांच्या तक्रारीला वारंवार केराची टोपली दाखवत कामात हलगर्जीपणा केल्याने हा रस्ता अद्यापही मोकळा झालेला नाही. सन १९७२ पासून हा रस्ता वहिवाटी साठी वापरत होते. परंतु मध्यंतरी कोकणे यांनी ह्या रस्त्यावर ताबा मारून हा रस्ता हस्तांतरित करून घेतला व पवार यांना या रस्त्यावरून वापर करण्यास मज्जाव घातला. त्यामुळे आज आखेरीस पवार दाम्पत्यांनी तहसील प्रशासनाच्या लक्ष वेधून घेण्याकरिता आपल्या कुटुंबियातील मुलगा, चिमुकली नात, पत्नी यांच्या सह २ बैल, १ गाय, १ कालवड,बैलबंडी व या पशुधनाला लागणारे वैरण असा सर्व गोतावळा घेऊन तहसील कार्यालया समोर आमरण उपोषण मांडले आहे.
न्याय मिळावा हीच अपेक्षा - उपोषणकर्ते दाम्पत्यआमच्या शेतीसाठी जाणारा रस्ता हा आम्ही सण १९७२ पासून वापरत असून सध्या धनशक्तीच्या जोरावर कोकणे यांनी अडवून तो हस्तांतरित केला. यामुळे आम्हाला आमच्या शेतात जाण्याचा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. येन सुगीच्या दिवसात शेतात जाण्यापासून अडविल्याने पिकांकडे दुर्लक्ष होत आहे. पहिलेच कोरोना संकटाने आर्थिक कंबरडे मोडले असताना हाती आलेला हा हंगाम हातातून गेला तर आमच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ येईल हे मात्र निश्चित त्यामुळे सदर रस्ता आम्हाला मोकळा करून द्यावा याकरिता मी व माझ्या कुटुंबीयांनी कोकणे यांना विनंती केली. परंतु कोकणे आम्हाला ॲट्रॉसिटीचा धाक दाखवून आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करीत आहेत याविषयी आम्ही तहसील कार्यालयाचे वारंवार पत्रव्यवहार केला परंतु सुस्त प्रशासन कामचुकार आणि वेळ मारून नेण्याचे काम करत असल्याने आज अखेरीस आम्हाला हे अभिनव उपोषणाचे हत्यार उपसावे लागले. आमच्या या उपोषणाची तहसिलदारांनी तात्काळ दखल घेऊन आम्हाला आमचा रस्ता मोकळा करून आम्हाला न्याय द्यावा ही अपेक्षा...

0 Comments