-->

Ads

महाराष्ट्रात प्रथमच रिक्षा चालकांसाठी स्वतंत्र कोविड लसीकरण.. अंबरनाथ शिवसेना शहरप्रमुख अरविंद वाळेकर यांचा पुढाकार..


           अंबरनाथ : काही दिवसांपूर्वी जोशी काका रिक्षा चालक मालक संघटना यांच्या तर्फे अध्यक्ष मिलिंद पाटील, कुमार मुदलियार आदी पदाधिकारी यांनी शिवसेना शहरप्रमुख अरविंद वाळेकर यांना विनंती केली की रिक्षा चालक जे दिवसभर रिक्षा चालवून उदरनिर्वाहाच्या धावपळीत असतात त्यांना रांगेत उभे राहून लस घेणे खूप दुरापस्त होत असल्याने व जनतेच्या सातत्याने संपर्कात येणार घटक असल्याने लस घेणे खूप गरजेचे आहे, ह्याचे महत्व लक्षात घेऊन अरविंद वाळेकर यांनी जातीने लक्ष घालत, छाया रुग्णालयातील डॉ. शशिकांत दोडे यांच्या मार्फत प्रशासनाकडे आग्रहाची मागणी केली आणि त्याचा पाठपुरावा केला. त्यांच्या मागणीचा विचार करून प्रशासनाने अंबरनाथ शहरातील रिक्षा चालकांसाठी डोस उपलब्ध करून दिले. 


         आज तळागाळातील सर्वसामान्य रिक्षा चालकांचा व नागरिकांचा आपुलकीने विचार करून डोस उपलब्ध करून दिल्याने रिक्षा चालकांसह सर्वसामान्य नागरिक समाधान आणि शिवसेना शहरप्रमुखांचे आभार व्यक्त करीत आहेत. 


         आज छाया रुग्णालयात याची सुरुवात म्हणून ५०० लसीचे लसीकरण रिक्षाचालकांना करून सुरुवात करण्यात आले. याप्रसंगी छाया उपजिल्हा रुग्णालयाचे डॉ. शशिकांत दोंडे, रिक्षा असोसिएशनचे अध्यक्ष मिलिंद पाटील, कुमार मुदलियार, माजी नगरसेविका सुमती पाटील, माजी नगरसेवक पद्माकर दिघे, एड. निखिल वाळेकर, अरविंद मालुसरे, पंकज पाटील, रुपसिग धल व शहरातील पत्रकार बांधव व असंख्य रिक्षा चालक उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments