-->

Ads

मूर्त पावलेल्या व्यक्तींच्या कुटुंबातील सदस्यांना बळीराजा चेतना अभियाना अंतर्गत धनादेश वाटप


उमरखेड तालुक्यातील टाकळी( ई )येथील गट ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या पिंपळवाडी येथे दिनांक 31 ऑगस्ट रोजी आदिलाबाद येथे काम करण्यासाठी पिंपळवाडी येथील मजूर कामकरन्यासाटी गेले होते 

उमरखेड प्रतिनिधी:- संजय जाधव

शेतामध्ये काम करीत असताना संगीता संजय जाधव वय 28 वर्ष यांच्यावर वीज कोसळून त्यांचा जागेवरच मृत्यू झाला होता व दुसऱ्या घटनेत पिंपळवाडी येथील कर्जबाजारी शेतकरी प्रकाश सिताराम चव्हाण यांनी विष घेऊन आत्महत्या केली होती 

या दोन्ही घटनेमधील  परिवारांना बळीराजा चेतना अभियानांतर्गत मृत्यू पावलेल्या ना धनादेशाचे दि १८/९/ २०२१ रोजी शनीवार ला वाटप करण्यात आले, आदिलाबाद येथे वीज पडून मृत्यू पावलेल्या संगिता संजय जाधव व प्रकाश सिताराम चव्हाण ह्या आत्महत्याग्रस्त कुटुंबांना ग्रामपंचायत टाकळी ई बळीराजा चेतना अभियान अंतर्गत धनादेशाचे वाटप करण्यात आले यावेळी टाकळी ग्रामपंचायतचे सरपंच उज्ज्वला हाके , उपसरपंच दिलीप जाधव, सचिव विनोद चव्हाण,  सदस्य संदेश मोरे, विठ्ठल गव्हाळे, उमेश जाधव, बाळू चव्हाण ,अतुल देवकते, मोहन जाधव, भारत जाधव प्रमोद  जाधव ,प्रदीप राठोड (इंजिनीयर) सामाजिक कार्यकर्ते संजय जाधव ह. भ .प. दत्ता महाराज, विनोद चव्हाण,  व नागरिक उपस्थित होते 

Post a Comment

0 Comments