ठाणे : प्रकल्पात बाधित होणाऱ्या बांधकामांचे मुल्यांकन देण्यासाठी एक लाखाची लाच स्वीकारताना सार्वजनिक बांधकाम विभागाचा शाखा अभियंत्याला याला ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ अटक केली आहे . अविनाश भानुशाली अस या शाखा अभियंत्याचं नाव असून सहा महिन्यानी हा अभियंता निवृत्त होणार होता .आज दुपारच्या सुमारास कल्याण येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यलयात सापळा रचत त्याला ताब्यात घेण्यात आले .धक्कादायक बाब म्हणजे भानुशाली याने यापूर्वी 4 लाख रुपयांची लाच स्वीकारल्याचा आरोप तक्रारदाराने केला आहे .या प्रकरणी ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुढील तपास करत आहे.
मुंबई वडोदरा द्रुतगती महामार्गाचे भुसंपादनात कल्याण नजीकच्या रायते गावातून जात असल्याने तक्रादाराचे बांधकाम यात बाधित होत आहे. सदर बांधकामांचे मुल्यमापन करुन अहवाल देण्यासाठी भानुशाली याने 9 सप्टेंबर रोजी पडताळणी दरम्यान यापूर्वी 4 लाख घेतले त्यानंतर 1 लाख रकमेच्या लाचेची मागणी केली होती . यामुळे त्रस्त झालेल्या तक्रारदारा ने ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे या प्रकरणी तक्रार केली होती तक्रारीनुसार ठाणे एसीबी युनिटने आज दुपारी एक वाजण्याच्या सुमारास सापळा रचून एक लाख रुपयांची लाच स्वीकारताना भानुशाली यांना रंगेहाथ अटक केली. याप्रकरणी पुढील चौकशी सुरू आहे.

0 Comments