-->

Ads

ठाण्यातील महिला सहाय्यक आयुक्तांवर झालेल्या हल्ल्याचा अंबरनाथमध्ये निषेध.. मोमीन युथ फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी अतिक्रमण विरोधी पथकाबरोबर केला निषेध



   अंबरनाथ : ठाण्याच्या कासारवडवली परिसरात रहदारीसाठी अडथळा निर्माण करणाऱ्या अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या ठाणे महापालिकेच्या महिला सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावर एका यादव नावाच्या परप्रांतीय फेरीवाल्याने कोयत्याने हल्ला करून त्यांची दोन बोटं छाटून टाकली, यात बचावासाठी मध्ये गेलेल्या सुरक्षा रक्षक देखील जखमी झाला असून त्याचा ही एक बोट कापला गेला. या हल्ल्याचा सगळीकडे निषेध व्यक्त करण्यात येत आहे. आज अंबरनाथ पालिकेच्या कर्मचारी व अधिकाऱ्यांनी देखील निषेध व्यक्त करत काम बंद केले.

         त्याचप्रमाणे शहरातील मोमीन युथ फाउंडेशनचे पदाधिकारी अकबर अली, एड. अझहर कुरेशी, सिकंदर कुरेशी, रफीक शेख आदींनी पालिकेच्या गेट समोर अतिक्रमण विरोधी पथकाचे पदाधिकारी नरेंद्र संख्ये, संदीप कांबळे, सुनील गावित यांच्या सोबत सदर घटनेचा जाहीर निषेध व्यक्त केला. यावेळी पथकाचे कर्मचारी हुसेन जहागीरदार, श्याम जाधव, शैलेश नागपुरे आदी उपस्थित होते.


उस्मान शाह, अंबरना


Post a Comment

0 Comments