-->

Ads

अतिक्रमण विरोधी पथकाची अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई.. ठाण्यातील महिला सहाय्यक आयुक्तांवर झालेल्या हल्ल्याचे अंबरनाथमध्ये पडसाद..



           अंबरनाथ : ठाण्याच्या कासारवडवली परिसरात रहदारीसाठी अडथळा निर्माण करणाऱ्या अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या ठाणे महापालिकेच्या महिला सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावर एका यादव नावाच्या परप्रांतीय फेरीवाल्याने कोयत्याने हल्ला करून त्यांची दोन बोटं छाटून टाकली, यात बचावासाठी मध्ये गेलेल्या सुरक्षा रक्षक देखील जखमी झाला असून त्याचा ही एक बोट कापला गेला. या हल्ल्याचे पडसाद आता सगळीकडे दिसू लागले आहेत. आज अंबरनाथ पालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने शहरातील अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई करण्यात आली.

        पालिकेचे मुख्याधिकारी डॉ. प्रशांत रसाळ यांच्या आदेशानुसार आणि अतिक्रमण विरोधी पथकाचे पदाधिकारी नरेंद्र संख्ये, संदीप कांबळे, सुनील गावित यांच्या नेतृत्वाखाली पथकाचे कर्मचारी हुसेन जहागीरदार, श्याम जाधव, मोहन पाटील, अनिल भिवाल, शैलेश नागपुरे, अनिल जाधव, अनवर शेख, भालचंद्र भोईर, मायकल जोसेफ आदींच्या टीमने शहराच्या पश्चिम आणि पूर्वेकडील मुख्य चौकात तसेच रेल्वे पादचारी पुलावर अतिक्रमण केलेल्या फेरीवाल्यांना उधळून लावले.


उस्मान शाह, अंबरनाथ

Post a Comment

0 Comments