अंबरनाथ : काही दिवसांपूर्वीच अंबरनाथ मधील खुंटवली विभागातील खामकर वाडी परिसरात दुचाकी वरील दोन अज्ञात इसमांनी एक दुकानदार महिलेच्या गळ्यातुन सोन लंपास केल्याची घटना घडली होती घटनेचा सीसीटीव्ही फुटेज असूनही त्यातील आरोपींचा अजूनही सुगावा लागला नसताना काल खुंटवली विभागात आणखी एक चोरी ची घटना घडली आहे आणि हि चोरी चक्क गावदेवी परिसरात असलेल्या श्री हनुमान मंदिरातील दानपेटीतुन झाली आहे हि घटना मंदिरात लावण्यात आलेल्या सीसीटीव्हीत कैद झाली आहे
एका अज्ञात चोरट्याने भर पावसाचा आणि रात्रीच्या शांततेचा फायदा घेऊन मंदिराच्या संरक्षक भिंतीवरून उडी मारून मंदिरात प्रवेश करून दान पेटीतील संपूर्ण दान लंपास केला आहे सकाळी मंदिराचे पुजारी मंदिरात आल्यानंतर सदर प्रकार उघडकीस आला ७० ते ८० हजाराची रक्कम चोरीला गेल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे सादर घटनेची पोलीस ठाण्यात तक्रार केली असून घटनेच्या ठिकाणी पोलीस चौकशी झाली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.
0 Comments