ऊमरखेड : प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघटना ऊमरखेड यांचे तर्फे आज पोफाळी पोलीस स्टेशनचे नवनियुक्त ठाणेदार राजीव हाके यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला, भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या,शुभ प्रसंगी महीला राज्य ऊपाध्यक्षा सविता चंद्रे,ऊमरखेड तालुका संघटक गजानन वानखेडे,ऊमरखेड तालुका सहसचिव हरीदास ईंगोलकर,ऊमरखेड तालुका ऊपाध्यक्ष सुनिल ठाकरे,ऊमरखेड तालुका सरचिटणीस संदेश कांबळे पत्रकार ऊपस्थित होते.
उमरखेड तालुक्यातील पोफाळी पो. स्टे. च्या ठाणेदारपदी ठाणेदार म्हणून राजीव कि. हाके रूजू झाले आहेत. त्यांनी २२ ऑगस्ट २१ रोजी राखी पौर्णिमेच्या शुभमुहूर्तावर आपला पदभार स्विकारला. पोफाळीचे ठाणेदार कैलास भगत यांची अकोला येथे बदली झाल्याने पोफाळी स्टेशनचे ठाणेदारपद रिक्त झाले हेाते. त्यामुळे पदभार सहाय्यक पोलीस निरीक्षक राजीव हाके यांच्याकडे देण्यात आला. पोफाळी पो. स्टे. ला जवळपास 40 गावे जोडली असून ठाणेदार राजीव हाके यांच्यावर परिसरात शांतता व सुव्यवस्था कायम ठेवण्याची जबाबदारी आली आहे. राजीव हाके २०११ साली पोलिस खात्यात दाखल झाले. प्रथम वर्धा व नंतर नागपूर येथे काम केले . पोफाळी पोलिस स्टेशन येथे येण्याचे अगोदर त्यांनी मागील काही वर्षी वसंत नगर पुसद पो. स्टे. चे ठाणेदार म्हणूनही काम पाहिले आहे,प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघटना चे यवतमाळ जिल्हाध्यक्ष अनिल राठोड,तालुका अध्यक्ष मारोती गव्हाळे,पदाधिकारी तथा सर्व संघटनेचे सदस्य यांनी पो.स्टे.ठाणेदार राजीव हाके यांना फोनवर शुभेच्छा दिल्या.
0 Comments