11 सप्टेंबरच्या सकाळी 11 वाजताच्या सुमारास खंबाळपाडा रोडवर एक व्यक्ती जखमी अवस्थेत रस्त्यावर पडला होता. काही ट्रॅफिक वार्डनने हे पाहिले. त्याची माहिती मानपाडा पोलिसांना दिली. जखमी व्यक्ती बेशूद्ध असल्याने त्याच्याकडून काही माहिती नाही मिळाली. त्याच्या खिशात त्याचे आधारकार्ड मिळून आले. त्याची ओळख पडली. त्याचे नाव कृष्णमोहन तिवारी असे होते. पोलिसांनी तपास सुरु केला. नंतर या व्यक्तीचा उपाचारा दरम्यान मृत्यू झाला. कल्याण पूर्वेतील काटेमानिवली परिसरात राहणारे कृष्ण तिवारी यांच्या मुलीने फक्त एवढेच सांगितले होते की पापांनी घरातून निघताना तिला सांगितला होता की ते ठाकुर्लीला एका कामानिमित्त जात आहे. मानपाडा पोलिसांनी डीसीपी विवेक पानसरे, एसीपी जे. डी. मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली मानपाडा पोलिस अधिकारी अविनाश वनवे यांनी तपास सुरु केला. कृष्णा तिवारी यांचा वडिलांचा काही महिन्यापूर्वी उत्तर प्रदेश मध्ये संपत्तीच्या वादातून हत्या झाली होती. पोलिसांसमोर हा पण एक अँगल होता. मानपाडा पोलिसांनी सीडीआर काढला. ज्या व्यक्तीने फोन केला होता त्याचा मोबाईल स्वीच ऑफ होता. सीमकार्डच्या आधारे सीमकार्ड ज्या व्यक्तीचे होते. त्याला पोलिसांनी शोधून काढले. ज्या व्यक्तीच्या नावे सीमकार्ड घेतले होते. त्या व्यक्तिला काही माहिती नव्हते. त्याच्या कागदपत्रंचा वापर सीमकार्ड खरेदी करण्यासाठी करण्यात आला होता. दोन दिवसासाठीहे सीमकार्ड घेतले होते. तांत्रिक माहितीच्या आधारे अखेर पोलिस रेहान शेख या तरुणार्पयत पोहचली. ज्याने कृष्णाला फोन केला होता. रेहान बेराजगारांना नोकरी मिळवून देण्यासाठी एका प्लेसमेंटमध्ये काम करीत होता. त्याच्याकडे बेरोजगार तरुण ज्यांना नोकरी पाहिजे त्यांच्या संपूर्ण डेटा उपलब्ध होता. नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली रेहान आणि त्याचे साथीदार लोकांना बोलावून घ्यायचे आणि लुटले आहे. कल्याणचे डीसीपी पानसरे यांनी माहिती दिली की, कृष्णा तिवारीला बोलावून घेत रेहान आणि त्याच्या साथीदारांनी एमआायडीसीतल निजर्न स्थळी नेले. त्याला मारहाण केली. त्याच्याकडील वस्तू लूटून त्याला जखमी करुन खंबाळपाडा रस्त्यावर फेकून दिले होते. या प्रकरणी रेहान शेख त्याचे साथीदार सागर कोनाला, सुमित सोनावणे आणि एका अल्पवयीन तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तिघांना अटक केली आहे. अल्पवयीन आरोपीची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली आहे. धक्कादायक म्हणजे फक्त या कामासाठी रेहान 15 सिम कार्ड li4 मोबाईल वापरत होता .मयत कृष्णा मोहन तिवारी हा मेकॅनिकल इंजिनिअर होता. तो कतार येथे काम करुन मायदेशी परतला होता. लॉकडाऊनमुळे त्याची नोकरी गेली होती. सध्या तो नोकरीच्या शोधात होता. नोकरीचा शोध हा त्यांच्या जीवनाचा अंत ठरला.

0 Comments