अंबड पोलिसांनी प्रियकर आणि प्रेयसी ला ताब्यात घेतले आसून तालुक्यातील वडगाव येथील 21 वर्षीय विवाहित महिला तिच्या भावाच्या उपचारासाठी अंबड येथे दवाखान्यात आली होती. तिच्यासोबत तिचा सहा वर्षाचा मुलगा आदित्य देखील होता. भावाला दवाखान्यात भरती केल्यानंतर औषध घेण्या साठी ही महिला दवाखान्याच्या बाहेर आली पण तीच्या मुलाला ऐका ठिकाणी थांबवण्याचा बहाना करून तिने तिथे असलेल्या तीच्या प्रियकराच्या स्वाधीन केले. आणि हा प्रियकर अनोळखी असल्याचाही बहाना केला. प्रियकर नवनाथ जगधने 22, राहणार पैठण याने माझ्यावर विश्वास ठेवा आणि हा नंबर घेऊन जा असे म्हणत या महिलेला एक मोबाईल नंबर दिला. थोड्याच वेळात ती महिला औषध घेऊन आली तोपर्यंत हे दोघेही गायब झाले होते. त्यानंतर मुलगा हरवल्याचा बहाना करून या महिलेने अंबड पोलिस ठाण्यामध्ये तक्रार दिली या तक्रारीच्या वरून पोलिस उपनिरीक्षक सुग्रीव चाटे यांना महिलेचा संशय आल्याने पोलिस यंत्रणा कामाला लागली वडगाव येथील गणेश रोकडे याला विचारपुस केली आसता पैठण येथील नवनाथ जगधने याने मुलाचा खून केल्याची माहिती मिळाली पैठण येथून नवनाथ जगधने याला ताब्यात घेतले आसता त्याने माझे व मयत मुलाची आई हिच्या सोबण प्रेम संबध आसल्याची कबूली दिली व अदित्य उघडे याला ऊसाच्या शेतात मारून फेकले आहे आशी माहिती सुग्रीव चाटे यांना दिली त्यावरून बालकाचे शव ताब्यात घेण्यात आले आहे.या गुन्ह्यात दोन जण अटक आसून महिलेला अटक करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

0 Comments