-->

Ads

कल्याण डोंबिवली कोरोनाचे नियम डावलून अश्लील कृत्य करत छम छम सुरू.. कल्याण क्राईम ब्रँच छापा मारून 56 जणावर गुन्हा केला दाखल.. बार चालक वेटर ,बारबालासह ग्राहकांचा समावेश..


              कल्याण :
डोंबिवली मानपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कल्याण मलंग राेडवरील माेनालिसा बार मध्ये बिनदिक्कतपणे अश्लील धांगडधिंगा सुरू होता .याबाबत कल्याण क्राइम ब्रांच ला माहिती मिळाली या माहितीच्या आधारे कल्याण क्राइम ब्रांचच्या पथकाने या बार वर 10 सप्टेंबर रोजी रात्री 9 वाजण्याच्या  सुमारास छापा टाकला .मोनालीसा बार मालक व चालक हे बिना नोकरनामा व परवाना बार चालवित असून बारमध्ये ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी महिलांची सर्व्हिस दिली जात असल्याचे उघड झाले .या प्रकरणी कल्याण क्राइम ब्रांचने 21 महिला, 30 ग्राहक व बारचालकासह वेटर मिळून 5 असे एकूण 56 जणांना ताब्यात घेत मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.कोरोना काळात एकीकडे सर्व सामान्य नागरिकांसाठी कोरोनाचे नियम लादले जात असताना डान्स बार मध्ये या नियमांचे उल्लंघन केले जात असल्याचे अनेकदा उघडकीस आले आहे.

Post a Comment

0 Comments