-->

Ads

फेसबुकवर झालेल्या मैत्रीने केला घात, 20 वर्षीय मुलाकडून वर्षभर अल्पवयीन मुलीवर बलात्कार

 

फेसबुकचा गैरवापर करण्याचे प्रमाण गेल्या काही दिवसात वाढली आहे. शेगावमधून अशीच एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. एका तरुणाने अल्पवयीने मुलीशी फेसबुकवरून मैत्री करून त्यानंतर तिच्यावर वारंवार बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे


    बुलडाणा, 15 मार्च: सोशल मीडियावर (Social Media) आपण एकमेकांशी जोडले जातो. अगदी लांब राहणारे मित्र-मैत्रिणी, नातेवाईक आपल्याशी जोडले जातात. काही नवीन मित्र देखील मिळतात. फेसबुक (Facebook) हा मित्र जोडण्यासाठी सर्वाधिक वापरला जाणारा ऑनलाइन प्लॅटफॉर्म आहे. मात्र गेल्या काही दिवसात फेसबुकचा गैरवापर करण्याचे प्रमाणही वाढले आहे. शेगावमधून अशीच एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. यामध्ये एका तरुणाने अल्पवयीने मुलीशी फेसबुकवरून मैत्री करून त्यानंतर तिच्यावर वारंवार बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पोलिसांनी संबंधित आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत.

    फेसबुकवरून 16 वर्षीय अल्पवयीन मुलीबरोबर या इसमाने मैत्री केली. त्यानंतर तिच्यावर शेगाव याठिकाणी असणाऱ्या एका लॉजमध्ये  बलात्कार केल्याची घटना घडली आहे. टाकळी विरो याठिकाणच्या या आरोपीविरोधात गुन्हा दाखल करून त्याला शेगाव पोलिसांनी अटक केली आहे. टाकळी विरो येथील आरोपी असलेला अतुल नारायण साठे या वीस वर्षीय युवकाने फेसबुकच्या माध्यमातून एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलीसोबत मैत्रीचे संबंध प्रस्थापित केले. 9 मार्च 2020 पासून मार्च 2021 दरम्यान आरोपीने या मुलीवर अत्याचार केला. या अल्पवयीन मुलीला शेगाव येथील मंदिराजवळील एका खाजगी लॉजवर नेऊन तिच्यावर वारंवार बलात्कार केला.
    काही दिवसांपूर्वी या मुलीने आईकडे छाती दुखत असल्याची तक्रार केली. तिच्या आईने तिला दवाखान्यात नेले असता डॉक्टरांनी ती दोन महिन्यांची गर्भवती असल्याचे सांगितले. त्यामुळे पिडीतेच्या आईला धक्काच बसला. आईने विचारणा केल्यावर मुलीने अतुल साठे याने तिच्यावर सातत्याने अत्याचार केल्याची आपबिती कथन केली. बालकल्याण समितीने मुलीचा जबाब नोंदविल्यानंतर शेगांव पोलिसांनी अतुल नारायण साठे याच्याविरुद्ध भादंवि कलम 376 सहकलम (6) पॉक्सोकायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला अटक करण्यात पोलिसांना यश आलं आहे.

    Post a Comment

    0 Comments