-->

Ads

उत्तर महाराष्ट्र मुख्यमंत्री पदापासून गेल्या अनेक वर्षांपासून वंचित : एकनाथ खडसे

 धुळे - भाजपमध्ये चार वर्षांपासून नाराज असलेले माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी काल राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर ज्येष्ठ नेते माजी मंत्री एकनाथ खडसे यांचे धुळे जिल्ह्यातील मुक्ती येथे जोरदार स्वागत करत, स्वागत सभा पार पडला. या सभेत एकनाथ खडसे यांनी भाजपावर जोरदार टिका केली आहे.

आपला जिल्हा विकासाच्या दृष्टिकोनातून अजुन पुढे गेला पाहिजे, मात्र आपल नेतृत्व ज्या ज्या वेळी पुढे आल त्या त्या वेळी आपल खच्चीकरण करण्यात आलं. नाथाभाऊ मुख्यमंत्री होऊ नये म्हणून माझ्या मागे ईडी लावली, अँटी करप्शन सारख्या चौकशी लावल्या अशी टीका एकनाथ खडसे यांनी भाजपवार केली. म्हणून उत्तर महाराष्ट्र हा नेहमी मुख्यमंत्री पदापासून वंचित राहिला आहे. भारतीय जनता पार्टी ही गेल्या अनेक वर्षांपासून शेटजी, भटजीचा पक्ष म्हणून भाजपची ओळख होती, ती आम्ही बहुजन समाजाचा पक्ष म्हणून आमच्या सारख्या नेत्यांनी वर आणला, मात्र असं असताना आमच्या पेक्षा कोणी मोठे होऊ नये या दृष्टिकोनातून प्रयत्न करण्यात आले, ते मात्र खूप हिन आहे असे देखील एकनाथ खडसे यांनी यावेळी बोलताना सांगितले.

Post a Comment

0 Comments