ठाणे - नवयुग मित्र मंडळ आयोजित सार्वजनिक नवरात्रौत्सवात आज भाजपा ठाणे जिल्हाअध्यक्ष आमदार निरंजन डावखरे व भाजप महाराष्ट्र प्रदेश सचिव संदीप लेले यांनी देवीचे दर्शन घेऊन प्रार्थना केली. या मंडळाच्या वतीने कोरोना महामारीत आपल्या जीवाची पर्वा न करता नियमितपणे आपले कार्य करणाऱ्या पोलिसांचे `कोरोना योद्धा' प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन सम्मान करण्यात आला.
कोरोनाच्या काळात अनेक व्यवहार सुरु झाले मात्र मंदिरे अजून देखील उघडण्यात आलेली नाही. ह्या प्रश्नावर आमदार डावखरे व संदीप लेले यांनी सांगितले कि भाजप पक्षानंतर आता विश्व हिंदू परिषद - बजरंग दलाकडून देखील मंदिरे उघडण्यासाठी सरकारचा निषेद करीत भजन कीर्तन करत आंदोलन केले जात आहे.
येत्या पुढल्या काळात मंदिरा लवकरात लवकर उघडली नाही तर आपल्या पद्धतीने सर्व महाराष्ट्रातील मंदिरे उघडणार असा इशारा राज्य सरकारला दिला,सोबत नवयुग मित्र मंडळाचे संस्थापक व भाजपा ठाणे शहर जिल्हा उपाध्यक्ष रमेशजी आंब्रे, नगरसेविका स्नेहाताई आंब्रे व मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

0 Comments