-->

Ads

अंबरनाथमधील भ्रष्ट रेशन दुकानदारांवर कारवाई करण्याची मागणी


                           अंबरनाथ रेशनिंग कृती समितीचे अन्ननागरी पुरवठा मंत्र्यांना पत्र


शासनाने गोरगरीब नागरिकांसाठी स्वस्त दरात धान्य उपलब्ध व्हावे म्हणून रेशनिंग प्रणाली सुरू केली असताना काही रेशनिंग दुकानदार मात्र धान्य वाटपात मोठ्या प्रमाणात घोटाळे करून नागरिकांना वेठीस धरत आहे,






काही शासकीय अधिकारी सुद्धा त्यांना सहकार्य करून या भ्रष्टाचाराला खतपाणी घालत आहे, अश्या भ्रष्ट रेशन दुकानदार व अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात यावी, या मागणीचे पत्र अंबरनाथ रेशनिंग कृती समितीचे सचिव अशोक साह यांनी थेट राज्याचे अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना पाठवले आहे.


        आपल्या निवेदनात अशोक साह यांनी विशेष करून अंबरनाथ पश्चिमेकडील बुवापाडा येथील रेशन दुकान क्र. ४६ फ ३६ चा उल्लेख केला आहे, त्यांचे म्हणणे आहे की या दुकानामध्ये नागरिकांना शासकिय नियमाप्रमाणे रेशन दिले जात नाही. याबाबत रेशन कार्यालय आणि ऑनलाईन तक्रार दाखल केल्या आहेत. परंतु स्थानिक रेशन निरीक्षक आणि रेशन अधिकारी यांचे या भ्रष्ट रेशन दुकानदारास सहकार्य असल्याने ते गरिब नागरिकांच्या तक्रारींची योग्य ती दखल न घेता या भ्रष्ट रेशन दुकानदारास सहकार्य करून वाचवतात. या तिघांच्या संगनमतानेच गरिबांच्या रेशनचा भ्रष्टाचार सुरू असल्याचे नागरिकांमध्ये चर्चा होत असते. सदर प्रकरणी नागरिकांतर्फे करण्यात आलेल्या तक्रारींची दाखल घेऊन या भ्रष्ट रेशन दुकानदार व संबंधीत अधिकारी यांना कठोर शासन करावे. 

Post a Comment

0 Comments