-->

Ads



आमदार डॉ. बालाजी किणीकर यांचा शहरप्रमुख राजेंद्र चौधरी यांच्यासह  नवीन प्रशासकीय इमारतीच्या  कामाचा पाहणी दौरा 

उल्हासनगर : आमदार डॉ. बालाजी किणीकर यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे मंजूर झालेल्या उल्हासनगर-५ येथील तहसील कार्यालयाच्या आवारात उभारण्यात येत असलेल्या प्रशासकीय इमारतीच्या  कामाचा  पाहणी  दौरा गुरुवारी आमदार डॉ. बालाजी किणीकर यांनी शहरप्रमुख राजेंद्र चौधरी यांच्यासह केला.या इमारतीचे बांधकाम अंतिम टप्प्यात आले असून लवकरच नागरिकांच्या सेवेकरिता एकाच छताखाली तहसील कार्यालय, सहायक दुय्यम निबंधक कार्यालय, बांधमापन कार्यालय, नागरी संरक्षण कार्यालय, राज्य उत्पादन कार्यालय, शिधावाटप कार्यालय, आदी शासकीय कार्यालये एकाच ठिकाणी नागरिकांसाठी उपलब्ध  होणार आहेत.
या पाहणी दौऱ्यादरम्यान शाखा प्रमुख राजू वालंज, भार्गव जाधव, विलास काकडे, यशवंत नेटकर, शाखा अभियंता एन.एस.गालफाडे आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments