-->

Ads

अंधेरीत व्यावसायिक इमारतीला मध्यरात्री आग......

अंधेरी इथल्या एका व्यावसायिक इमारतीला मध्यरात्री आग लागली.


मुंबई : अंधेरी इथल्या एका व्यावसायिक इमारतीला मध्यरात्री आग लागली. या इमारतीच्या पाचव्या आणि सहाव्या मजल्यावर ही आग लागली होती. ही आग नियंत्रणात आणण्यासाठी अग्निशमन दलाच्या सहा गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांना अथक प्रयत्नांनंतर या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं. या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

चौकशी होणार 

 या इमारतीत अग्निशमन नियमांचे पालन केले होते का ? याची चौकशी करण्यात येत आहे.
याआधीही मुंबईतील इमारतीत आगीच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. यात निष्पाप नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.


www.3dnews.in            

Post a Comment

0 Comments