-->

Ads

मित्रासंह व्हिस्कीचे १२ पेग रिचवले आणि.. अपघाताआधी मिहीर शाहने काय-काय केलं ?

 

मित्रासंह व्हिस्कीचे १२ पेग रिचवले आणि.. अपघाताआधी मिहीर शाहने काय-काय केलं ?


वरळी हिट अँड रन प्रकरणाने अख्खी मुंबई हादरली. रविवारी पहाटे झालेल्या अपघातात गाडीखाली चिरडली गेल्याने कावेरी यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मात्र त्यानंतर मुख्य आरोपी मिहीर शाह हा दोन दिवस फरार होता. अखेर मंगळवारी दुपारी पोलिसांनी त्याला अटक केलीवरळी हिट अँड रन प्रकरणाने अख्खी मुंबई हादरली. रविवारी पहाटे झालेल्या अपघातात गाडीखाली चिरडली गेल्याने कावेरी यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मात्र त्यानंतर मुख्य आरोपी मिहीर शाह हा दोन दिवस फरार होता. अखेर मंगळवारी दुपारी पोलिसांनी त्याला अटक केली. त्याच्यासह त्याचे मित्र, आई-बहीणही पोलिसांच्या ताब्यात आहेत. बुधवारी मिहीरला कोर्टासमोर हजर केलं असता, न्यायालयाने त्याला 16 जुलैपर्यंत पोलिस कोठडी ठोठावली आहे. या अपघाताप्रकरणी पोलिसांकडून कसून चौकशी सुरू असून रोज नवनवे अपडेट्स समोर येत आहेत. आता मिहीर पोलिसांच्या ताब्यात असून त्याचीही कसून चौकशी करण्यात येणार आहे. आरोपीने अपघातानंतर कारची नंबरप्लेट कुठे टाकली? तसेच कोणाकोणाला संपर्क केला? त्याला नेमकी कोणी , कशी मदत केली, या सर्व प्रश्नांची उत्तर आता मिहीरकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहेत.

दरम्यान आता या अपघाताप्रकरणी आणखी एक नवी माहिती समोर आली आहे. रविवारी पहाटे हा अपघात होण्यापूर्वी मिहीर व त्याचे मित्र जुहूमधील बारमध्ये पार्टी करत होते. त्याच बारमध्ये त्यांनी व्हिस्कीचे १२ पेग रिचवल्याचे समोर आले आहे. अपघाताच्या ४ तास आधी मिहीर शहा आणि मित्रांनी विस्कीचे १२ पेग प्यायल्याची माहिती उघड झाली आहे. मात्र आरोपी मिहीर शाह याला २५ वर्षे पूर्ण झालेली नसतानाही त्याला व्हिस्की देण्यात ाली होती, म्हणूनच या बारवर कारवाई करण्यात आली होती. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कारवाईनंतर काल मुंबई महानगरपालिकेने बारवर तोडक कारवाई केली.

या प्रकरणातील महत्त्वाचे अपडेट्स :

  1.  वरळी हिट अँड रन प्रकरणातील मुख्य आरोपी मिहीर शाह याला तिसऱ्या (मंगळवारी) दिवशी अटक करण्यात आली.
  2. मिहीर शाह याची आई आणि दोन बहि‍णींना शहापूरमधून अटक करण्यात आली आहे.
  3. मिहीरला अटक करतानाच, त्याला मदत करणाऱ्या 12 जणांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये त्याची आई आणि दोन्ही बहि‍णींचादेखील समावेश आहे.
  4. आरोपी मिहीर शाह अपघातानंतर मोबाईल स्विच ऑफ करुन फरार होता.
  5. मिहीर शाह मुंबईतल्या काही भागात लपून लपून वास्तव्य करत होता.
  6. मिहीरला लपण्यसाठी मदत करणाऱ्या 12 जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे.
  7. या प्रकरणात आता किती जाणाना आरोपी करायचं? याबाबत तपास करुन निर्णय घेणार आहेत.
  8. अपघात प्रकरणात मिहिरचे वडील राजेश शाह यांना कोर्टाकडून जामीन मंजूर झालाय. तर त्याच्या गाडीचा ड्रायव्हर अद्यापही अटकेतच आहे.
  9. वरळी हिट अँड रन प्रकरणात कावेरी या महिलेचा मृत्यू झाला तर तिचे पती जखमी झाले.
  10. या अपघाताप्रकरणी मिहीर याची १६ जुलैपर्यंत पोलिस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.

नेमंक काय आहे प्रकरण?

मुंबईमधील वरळी येथे रविवारी पहाटे 5 वाजता प्रदीप नाखवा आणि कावेरी नाखवा हे मच्छीमार दाम्पत्य गाडीवरून चालले होते. ससून डॉक बंदराकडून ते मासे घेऊन येत होते. या दाम्पत्याला बीएमडब्ल्यू गाडीने जोरदार धडक दिली. धडक दिलेल्या गाडीमध्ये मिहिर शाह आणि त्याच्यासोबत आणखी एक व्यक्ती होती. धडक दिल्यावर दाम्पत्य खाली पडले, त्यानंतर कावेरी नाखवा यांना बीएमडब्ल्यूने फरफटत नेलं. प्रदीप नाखवा यांनी सांगितल्यानुसार कावेरी यांनी सी लिंक पर्यंक फरफटत नेलं. त्यांच्या अंगावरील कपडेही फाटले होते. उपचारादरम्यान कावेरी यांचा मृत्यू झाला. वरळीच्या कोळीवाड्यात नाखवा मच्छीमार दाम्पत्य राहत होते.

मिहिर शाह हा कार चालवत होता. अपघातानंतर मिहीर घटनास्थळावरून फरार झाला. पोलिसांनी चालक ड्रायवर राजेंद्र सिंग बिडावत आणि वडील राजेश शाह यांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं. मात्र सोमवारी राजेश यांना जामीन मिळाला. अपघाताच्या दोन दिवसांनंतर अखेर फरार आरोपी मिहीर शाह याला व त्याच्यासह १२ जणांना अटक करण्यात आली.


Post a Comment

0 Comments