-->

Ads

लहान भावासह पत्नीला त्या परिस्थितीत पाहिलं, संतापलेल्या भावाकडून मारहाण, मग असा घेतला बदला...

Husband Caught Wife Affair: छठ पूजेसाठी पत्नीसह गावी आलेल्या तरुणाची त्याच्याच लहान भावाने हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.


पाटणा: छठ पूजा साजरी करण्यासाठी गावी आलेल्या तरुणाची हत्या करण्यात आली आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावला असून हत्येत सहभागी असलेल्या मृताची पत्नी आणि मृताच्या भावासह पाच जणांना अटक करण्यात आली आहे. दीर आणि वहिनीमध्ये अनैतिक संबंध होते, असे पोलिसांचे म्हणणे आहे. त्यातूनच हे हत्याकांड घडले. याप्रकरणी पुढील कार्यवाही सुरू आहे. बिहारमधील बेगुसरायमध्ये ही घटना घडली आहे.

बछवारा पोलिस स्टेशन हद्दीतील राजापूर गावात राहणारा अजय साहनी याची १९ नोव्हेंबरच्या रात्री गळा आवळून हत्या करण्यात आली होती. यानंतर मृतदेह गावाबाहेरील शेतात फेकून देण्यात आला. याप्रकरणी एसपी योगेंद्र कुमार यांनी तेघरा डीएसपी रवींद्र मोहन प्रसाद यांच्या नेतृत्वाखाली पोलिस दल तयार केले होते. यानंतर पोलिस पथकाने तांत्रिक आणि पाळत ठेवत संपूर्ण हत्येचा उलगडा केला आहे.

एसपी योगेंद्र कुमार म्हणाले की, हत्येनंतर चार दिवसांत संपूर्ण प्रकरण उघड झाले. भावजय आणि वहिनी यांच्यातील अनैतिक संबंधामुळे भावानेच भावाच्या हत्येचा कट रचला होता. यामध्ये मृताच्या पत्नीचाही सहभाग होता.Post a Comment

0 Comments