-->

Ads

रेल्वे प्रवाशांसाठी मोठी बातमी! पुणे-मुंबई दरम्यान धावणाऱ्या 'या' रेल्वेगाड्या आज रद्द

Pune Mumbai Train Cancelled: आज, रविवारी दिवसभर पुणे-मुंबई दरम्याची रेल्वे सेवा बंद राहणार आहे. तसेच काही लोकल फेऱ्या रद्द, तर काही गाड्या विलंबाने धावणार आहेत. वाचा वेळापत्रक.


पुणे : पुणे रेल्वे विभागातील शिवाजीनगर-खडकी स्थानकादरम्यान इलेक्‍ट्रॉनिक इंटरलॉकिंगच्या कामाला शनिवारी रात्री सुरुवात करण्यात आली. त्यामुळे रविवारी दिवसभर पुणे-मुंबई दरम्याची रेल्वे सेवा बंद राहणार आहे; तसेच लोकलच्या फेऱ्यादेखील रद्द राहणार आहेत. काही गाड्या विलंबाने धावणार आहेत. रविवारी रात्री सहा वाजून वीस मिनिटांपर्यंत हे काम पूर्ण केले जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

मुंबई-पुणे इंटरसिटी एक्‍स्प्रेस, मुंबई-पुणे डेक्कन एक्‍स्प्रेस, मुंबई-कोल्हापूर कोयना एक्‍स्प्रेस, पुणे-मुंबई डेक्कन क्वीन, पुणे-मुंबई सिंहगड एक्‍स्प्रेस, पुणे-मुंबई इंटरसिटी एक्‍स्प्रेस, पुणे-मुंबई डेक्कन एक्‍स्प्रेस, कोल्हापूर-मुंबई कोयना एक्‍स्प्रेस

आवश्यकेतनुसार जादा बस

पुणे-मुंबई दरम्यान रेल्वे सेवा बंद राहणार असल्यामुळे प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून एसटीकडूनदेखील तयारी करण्यात आली आहे. स्वारगेट एसटी स्थानकातून गरजेनुसार अतिरिक्त गाड्या सोडण्याची तयारी एसटी महाममंडळाकडून ठेवण्यात आली असल्याचे प्रशासनाने सांगितले.


Post a Comment

0 Comments