-->

Ads

रुग्णालयातून परतताना भयंकर घडलं, पुण्यात भरधाव कार ओढ्यात कोसळून डॉक्टरचा मृत्यू

Doctor Died In Accident In Pune: रुग्णालयातील काम आटोपून निघालेल्या डॉक्टरचा वाटेत भयानक अपघात होऊन मृत्यू झाला आहे. मावळ तालुक्यातील चांदखेड येथील ओढ्यात कार कोसळून या डॉक्टरचा मृत्यू झाला आहे.


मावळ, पुणे: मावळ तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मावळ तालुक्यात असणाऱ्या चांदखेड येथे ओढ्यामध्ये भरधाव वेगात असणारी कार कोसळली आहे. या कारमध्ये असणाऱ्या एका व्यक्तीचा यात जागेवर मृत्यू झाला आहे. ती व्यक्ती डॉक्टर असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. डॉ. सत्यजित अर्जुनराव नवाडे (वय ४२) असे मृत्यू झालेल्या डॉक्टरचे नाव असून रविवारी मध्यरात्री हा अपघात झाला असल्याची माहिती समोर आली आहे.


याबाबत अधिक माहिती अशी की, मावळ तालुक्यातील नेरे दत्तवाडी येथे डॉ. सत्यजित नवाडे यांचे हॉस्पिटल आहे. सर्व काम उरकल्यानंतर डॉक्टर चांडखेड येथून कारने बाहेर जात होते. मध्यरात्र असल्याने रस्त्यावर कोणतीही रहादारी नव्हती. त्यामुळे गाडी वेगात होती. मात्र, काही अंतर गेल्यावर चांदखेड गावाजवळ आल्यानंतर ओढ्यात गाडीवरील नियंत्रण सुटल्याने गाडी शेजारी असलेल्या ओढ्यात कोसळली. गाडीचा आवाज झाल्याने स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर याबाबत रुग्णवाहिकेचे काम बघणारे अजय मुऱ्हे यांना नागरिकांनी माहिती दिली. त्यांनी पोलिसांना याबाबत कळवले.

त्यानंतर यंत्रणेची हालचाली सूरू झाली. त्यानुसार, वन्यजीव रक्षक मावळ संस्था, शिवदुर्ग मित्र लोणावळा, आपदा मित्र मावळ संस्थेचे निलेश गराडे, अजय मुन्हे, अनिश गराडे, कृष्णा गायकवाड, प्रतीक थोरवे, शुभम काकडे, विनय सावंत, विकी दौंडकर, गणेश ढोरे, शिरगाव पोलिस आणि स्थानिक नागरिक घटनास्थळी दाखल झाले. या सर्वांनी अथक प्रयत्नानंतर ट्रॅक्टरच्या सहाय्याने कार बाहेर काढण्यात आली. कारमध्ये डॉ. सत्यजित नवाडे अडकले होते. त्यांना बाहेर काढून रुग्णालयात दाखल केले. मात्र, त्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. त्यांच्या जाण्याने नवाडे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.


Post a Comment

0 Comments