-->

Ads

किशोर आवारे यांच्या जयंती निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

तळेगाव दाभाडे : जनसेवा विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष कै. किशोर आवारे यांच्या जयंतीच्या निमित्ताने तळेगाव दाभाडे येथील स्वप्ननगरी येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. 

१२मे २०२३ रोजी किशोर आवारे यांची निर्घृण हत्या करण्यात आली होती. या भ्याड हल्ल्याचा सर्व स्तरातून निषेधही व्यक्त करण्यात आला. किशोर 

आवारे यांनी सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी   अहोरात्र कष्ट घेतले. आवारे गरिबांच्या गळ्यातील ताईत बनले होते. गरिबांचे ते कैवारी होते.

जनसेवा विकास समितीने पंचवार्षिक  नगरपालिका निवडणुकीमध्ये चांगले यश संपादक करीत आपले  आगळे वेगळे स्थान निर्माण केले होते. 


आवारे यांच्या जयंतीनिमित्त  रविवारी (दि.१९) सायंकाळी ६ वाजता  हरिभक्त पारायण भास्कर महाराज रसाळ यांचे प्रवचन होणार आहे. यानंतर भोजन व त्यानंतर हरिजागर (भजन) होणार आहे. त्याचबरोबर सामाजिक संस्थांना देणगी, अन्नदान आदी कार्यक्रमाच्या आयोजन केले आहे , अशी माहिती किशोर आवरे मित्रपरिवाराने दिली.

Post a Comment

0 Comments