-->

Ads

ऊमरखेड तालुका कृषी विभाग ठरतोय पांढरा हत्ती मार्गदर्शना अभावी शेतीचे नुकसान

 शेतकऱ्यांच्या आत्महत्याही वाढल्या 


यवतमाळ प्रतीनीधी :- संजय जाधव उमरखेड तालुका कृषी विभाग शेतकऱ्यांना कोणतेही मार्गदर्शन करत नाही. कृषी केंद्रावर नियंत्रण राहिले नाही. हा विभाग म्हणजे केवळ शासनाचा 'पांढरा हत्ती ठरल्याची भावना शेतकऱ्यांत निर्माण झाली आहे.

कृषी केंद्रातून मनमानी पद्धतीने खत, बियाणे, औषधांची आणि त्यातही बिना पावतीने विक्री केल्या जात आहे. सोयाबीनवर येलो मोझॅक आलेला असून कोणती काळजी घेतली पाहिजे याविषयी तालुका कृषी कार्यालयाकडून शेतकऱ्यांना अपेक्षा आहेत. मात्र तालुका कृषी अधिकारी, कृषी सहायक मार्गदर्शना करिता फोन केला तर 

ते शेतकऱ्याचा फोन उचलत नाहीत. हा विभाग शेतकऱ्याच्या कामी पडत नसेल तर तो बंद केलेलाच बरा असे मत उपक्रमशील शेतकरी  ऊदल राठोड यांनी व्यक्त केले. सोयाबीनवर येलो मोझॅक आलेला असून तो फर्स्ट स्टेजमध्ये असल्यामुळे तालुका कृषी कार्यालयाकडून शेतकऱ्यांना मार्गदर्शनाची अपेक्षा आहे. कृषी विभागाकडून कोणतीही जनजागृती


नाही एखाद्या शेतकऱ्याने मार्गदर्शन मागितले तर ते मिळत नाही काढले जात नाही. कार्यालयामध्ये शेतकऱ्यांना सन्मानाची वागणूक मिळत नाही. बायो ३०३ यात बरीच मिलावट येत असल्याची शेतकऱ्यातून ओरड आहे. हे औषध कपाशीवर फवारणी करण्यासाठी विकले जात असून कृषी केंद्रामधून शेतकऱ्यांना त्याची पावतीसुद्धा दिली जात नाही. तालुका कृषी कार्यालयाचे नाहीत.

अधिकारी कृषी केंद्रावर तपासणीऐवजी विशिष्ट तारखेलाच आढळून येत असल्यामुळे तालुका कृषी कार्यालय शेतकऱ्यांच्या हितासाठी काम करत आहे की, कृषी केंद्र संचालकाच्या हितासाठी असा सवाल उपस्थित केला जात आहे. कृषी केंद्रातून सॅम्पल

जे सॅम्पल फेल होऊन आलेले आहे त्यावर अजून कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नाही. त्यामुळे अशा दुकानदारांचे मनोबल चांगले उंचावले आहे. मालाची उपलब्धता बी बियाणे, खताचे दर आवश्यक असलेले फलक दर्शनी भागावर कुठे आढळून येत नाही

Post a Comment

0 Comments