उपविभागीय अधिकारी एकनाथराव काळबांडे यांच्या हस्ते ध्वजारोहण सोहळा संपन्न
मुंबई : ‘डबल आईस्मार्ट’ या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान अभिनेता संजय दत्तच्या डोक्याला तलवार लागल्याने या अपघात तो गंभीर जखमी झाला. त्याच्या डोक्याला टाके मारावे लागले.
लवकरच त्याचा ‘डबल इस्मार्ट’ हा सिनेमा चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाच्या शूटिंगच्या दरम्यान संजय दत्तच्या डोक्याला टाके पडल्याचे सांगितले जात आहे. ’डबल इस्मार्ट’ या सिनेमाचे बँकॉकमध्ये शूटिंग सुरु आहे. तलवारबाजीचा सीन शूट करत असताना संजय दत्तचा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. त्याच्या डोक्याला टाके पडले आहेत.
त्याला तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. परंतु संजय दत्तने उपचार घेतल्यावर शुटिंग पूर्ण करण्यात येणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना गेल्या आठवड्यात घडली होती आणि आता संजय दत्त पूर्णपणे बरा असल्याचे सांगितले जात आहे. ‘डबल इस्मार्ट’ हा संजय दत्तचा पहिला तेलुगू सिनेमा आहे.
संजय दत्तने ‘केजीएफ चॅप्टर २’ या सिनेमाच्या माध्यमातून कन्नड मनोरंजन सृष्टीमध्ये एन्ट्री केली होती. यानंतर त्याचा ‘लियो’ हा सिनेमा तामिळ भाषेत आहे. या सिनेमातून तो तामिळ मनोरंजनसृष्टीमध्ये पदार्पण करणार आहे.

0 Comments