या वेळी बोलताना शिवनदास पमनानी, आणि कन्हैयालाल केसवानी यांनी सांगितले की त्या वेळी तेथील मुस्लिम समाजातील लोकांनी प्रचंड अत्याचार केले आणि अनेक बांधव तेथेच मुस्लिम धर्म स्वीकारून राहीले पण कट्टर हिंदुत्ववादी राष्ट्रभक्त होते ते भारतात तेथील संपूर्ण संपती सोडून भारतात आले त्या वेळी महाराष्ट्रातील उल्हासनगर आणि पिंपरी येथे त्याच्या साठी छावणी उभारण्यात आली तेव्हा पासून ते भारताचे नागरिक म्हणून राहू लागले
आणि विषेश म्हणजे महाराष्ट्रातील मराठी बांधवांनी त्यांना आपले मानून आज ही मनापासून एकत्र नांदत आहेत
यावेळी भगवानदास खत्री, शिवनदास पमनानी, कन्हैयालाल केसवानी, आणि गणेशोमल पंजाबी यांचा भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष शंकरभाऊ जगताप, प्राधिकरणचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, पिंपरी विधानसभा प्रमुख अमित गोरखे, प्रदेश भारतीय जनता पक्षाचे दक्षिण आघाडीचे प्रदेश अध्यक्ष राजेश पिल्ले, ज्योतीका मलकानी, रेखा कडाली, वैशाली खाडये, गणेश ढाकणे, गणेश वाळुंजकर, शितल शिंदे, शैलेश मोरे आदी मान्यवर उपस्थित होते या वेळी बोलताना शहराध्यक्ष जगताप म्हणाले की आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्वाखाली आपला देश जगातील तिसर्या अर्थ व्यवस्था असलेला देश म्हणून जगासमोर आणायचा आहे आणि त्या साठी आपण सगळे मिळून एकजुटीने त्याच्या मागे उभे राहून देश जगातील सर्वात प्रगत करण्याचा प्रयत्न करूया
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मनोहर जेठवानी, गोपी आसवांनी, किरण रामनानी,कंचन रामनानी, जयदेव डेब्रा, राजेश चांदवानी, अजीत कंजवानी, मनोज पंजाबी, इंदर बजाज, सुशिल बजाज, हेमंत राजेश सारिका मँडम आदींनी परिश्रम घेतले
0 Comments