एका ३७ वर्षीय व्यावसायिकाने पत्नीची दोन मुलांसमोर गळा आवळून हत्या केल्याची धक्कादायक घटना रविवारी सकाळी घडली. उत्तरप्रदेशातील सुलतानपूर येथील पूर्वांचल एक्स्प्रेस वेवर कारमध्ये हा सगळा प्रकार घडला. दरम्यान या निर्घुण हत्येचं कारण हे पत्नीचे इंस्टाग्रामवरील फॉलेअर्स असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
याबाबत अधिक माहिती देताना कुरेभारचे एसएचओ प्रवीण कुमार यादव यांनी सांगितले की, आरोपी टूर अँड ट्रॅव्हल एजन्सीचा मालक आहे, तर त्याची पत्नी गृहिणी आहे. लखनऊच्या पारा भागात हे दाम्पत्य १२ वर्षांची मुलगी आणि पाच वर्षांच्या मुलासह राहत होते.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी सकाळी हे दाम्पत्य रायबरेलीच्या प्रवासाला निघाले होते, पण त्याऐवजी ते पूर्वांचल एक्स्प्रेस वेकडे वळले. पहाटे पाचच्या सुमारास आरोपी सुलतानपूर येथील मुजेश चौकात थांबला असता त्याचा पत्नीशी वाद झाला. रागाच्या भरात त्याने तिचा गळा दाबून खून केला. हे भयानक दृश्य पाहून मुले रडायला लागली मात्र आरोपीने स्वत:ला एसयूव्हीमध्ये बंद करून घेतलं
दरम्यान UPEIDA च्या गस्ती पथकाला संशयास्पदरित्या गाडी उभी असल्याचे लक्षात येताच संशय निर्माण झाला. त्यांनी तत्काळ आपल्याला आणि जवळच्या पोलिस स्टेशनला माहिती दिली. त्यानंतर पोलिस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. यानंतर गाडीतील या दाम्पत्याच्या मुलीने तेथे नेमकं काय घडलं याबद्दल माहिती दिली. तिने तिच्या वडिलांनी तिच्या आईची हत्या केल्याची माहिती पोलिसांना चिली. त्यानंतर तिच्या जबाबाच्या आधारे आरोपीला अटक करण्यात आली.
0 Comments