कधी कोणासोबत काय घडेलयाचा नेम नसतो. एक तरुण धबधब्यावर मौजमजा करण्यासाठी गेला होता. मात्र, धबधब्यावर त्याच्यासोबत असं काही घडलं ज्याचा कोणी कधी विचारही केली नसेल.
अमरावती: 'मौत का कोई पता नहीं, बात कर लिया करो', असं म्हणत अमरावती येथील एका युवकाने रील शूट केला आणि काही काळातच त्याचा धक्कादायक हादरवणारा मृत्यू झाल्याची घटना घडली. ही बातमी वाऱ्यासारखी पसरल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
सध्या चिखलदरा आणि परिसरातील धबधबे ओसंडून वाहत आहेत. या धबधब्याचा आनंद घेण्यासाठी तरुणाई मोठ्या प्रमाणात धबधब्यावर येतात. ते उत्साहाने धबधब्याखाली आंघोळ करताना दिसतात. परतवाडा येथील रहिवासी विनय बोरकर (वय २६) हा आपल्या मित्रांसोबत महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या सीमेवर असलेल्या धारखोरा या धबधब्यावर आंघोळ करायसाठी गेला होता. त्या अगोदर त्यांनी एक भावनिक रील शूट केला होता. त्यामध्ये तो म्हणाला की, 'मौत का कुछ पता नहीं, बात कर लिया करो, क्या पता कल तुम याद करोगे और हम रहे ही ना'.
त्याच्या काही तासानंतरच त्याच्या मृत्यूची बातमी आली. तो धबधब्यावर आंघोळ करत होता. तेवढ्यात सुमारे अडीचशे फूट उंच धबधब्यावरून एक दगड वेगाने डोक्यावर येऊन कोसळला. दगड इतक्या उंचावरुन थेट डोक्यावर पडल्याने त्याच्या मेंदूचे चक्क दोन तुकडे झाले. ही घटना घडताच तिथे उपस्थितांमध्ये एकच खळबळ माजली. त्यानंतर तात्काळ त्याला धबधब्याखालून बाहेर काढण्यात आलं.
0 Comments