-->

Ads

महाराष्ट्राला लाजवणारी घटना! पतीला डांबून महिलेसोबत 11 जणांचं राक्षसी कृत्य

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार ही पीडित महिला 28 वर्षांची आहे. तिला तीन मुलं आहेत. ती पतीसोबत कोळसा खाणीत काम करायला गेली होती


सातारा :महाराष्ट्राला लाज आणणारी घटना समोर आली आहे. पतीला खोलीत डांबून कारखान्यात काम करणाऱ्या महिलेसोबत एक दोन नाही तर तब्बल 11 जणांनी राक्षसी कृत्य केलं आहे. या राक्षसी वृत्तीच्या कामगारांच्या तावडीतून पती आणि महिलेनं कशीबशी स्वत:ची सुटका केली आणि त्यानंतर रायगडला आले.

रायगडमध्ये आल्यानंतर या महिलेनं आणि तिच्या पतीनं आपल्या मामाला हा भयंकर प्रकार सांगितला आहे. त्यानंतर विरार पूर्व इथे पोलिसांनी पीडितेचं म्हणणं ऐकून घेतलं. आता सातारा पोलिसांनी या पीडित महिलेला जबाब नोंदवण्यासाठी आपल्यासोबत घेऊन गेले आहेत.


Post a Comment

0 Comments