-->

Ads

🔹फुलसावंगी येथील सरपंचावर अविश्वास दाखल..


🔸१५ सदस्य सरपंचाच्या विरोधात जाण्याची शक्यता 

♦️सरपंचा च्या मनमानी कारभारामुळेच अविश्वास दाखल

फुलसावंगी/प्रतिनिधी 

   महागाव तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून फुलसावंगी येथील ग्रामपंचायतकडे बघीतल्या जाते.सध्या फुलसावंगी ची ग्रामपंचायत या-ना त्या कारणाने तालुक्यात प्रसिद्ध झाली आहे.येथील १५ ग्रामपंचायत सदस्यांनी सरपंच शितल भिसे यांच्या विरूद्ध अविश्वास ठराव दाखल केला आहे.या ग्रामपंचायतची निवडणूक हे दोन वर्षापूर्वी झाली होती.ग्रामपंचायत मध्ये एकूण १७ सदस्य आहेत.त्यापैकी १६ सदस्य हे सत्ताधारी पार्टीचे निवडून आले होते.तर विरोधी पॕनलाचा केवळ एकच सदस्य निवडून आला होता.परंतु काही महिन्यापुर्वी सत्ताधारी गटाच्या सरपंचानेच विरोधी गटात प्रवेश केल्याने केवळ एकच ग्रा.प.सदस्य असलेल्या विरोधी गटाचेच वर्चस्व गेल्या काही दिवसापासून ग्रामपंचायतवर  दिसून येत होते.ज्या सदस्यांनी सरपंचाना सत्तेच्या खुर्चीवर बसविले त्यांचे कुठल्याही प्रकारचे ऐकत नसल्याने तसेच सदस्यांना विश्वासत ने घेता सरपंच मनमानी कारभार करत असल्या कारणाने अविश्वास ठरावावर १५ सदस्यांनी सह्या करून अविश्वासाचे कारण देखील देण्यात आले आहे.तसे पञ १५ सदस्यांच्या उपस्थितीत महागाव तससिलदार यांना देण्यात आले आहे.

  पदाचा दुरपयोग करून,मनमानी कारभार करणे,मासिक सभेमध्ये घेतलेल्या ठरावाची अंमलबजावणी न करणे,नियमाप्रमाणे मासिक सभा व ग्रामसभा न घेणे,ग्रामपंचायतच्या विकासकामामध्ये पुर्णतःदुर्लक्ष करूने,पुर्व सुचना देवून,सदस्यांनी मांडलेले विषय सभेच्या विषय सुचिवर न घेणे,सदस्याशी असभ्य वर्तन करणे,महिलासदस्यांशी हेटाळी करून असभ्य वर्तन करणे,तसेच त्यांच्या पतींचा ग्रामपंचायत कारभारात वाढता हस्तक्षेप होत असल्याने या सर्व कारणांमुळे १५ सदस्यांनी सरपंचा विरोधात अविश्वास ठराव दाखल केला आहे.

सदरील विषयावर सरपंच यांची प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याशी संपर्क होवु शकला नाही.

******

ग्रामपंचायत फुलसावंगी मध्ये सरपंच च्या मनमानी कारभारामुळे फुलसंगीच्या विकास कामांना खीळ बसली होती.पंधराव्या वित्त आयोगा तील भ्रष्टाचारामुळे आज आम्ही 15 सदस्य यांनी सरपंचाविरुद्ध अविश्वास ठराव दाखल केलेला आहे.

Post a Comment

0 Comments