-->

Ads

महिला डॉक्टरकडे वरिष्ठाकडून शरीरसुखाची मागणी, नकार देताच इंजेक्शन देऊन.. बीडमध्ये खळबळ

 

बीडच्या अंबाजोगाई शहरालगत असणाऱ्या वाघाळा येथील नवजीवन व्यसनमुक्ती केंद्रातील संतापजनक प्रकार घडला आहे.
















    बीड, 11 मार्च : व्यसनमुक्ती केंद्रात डॉक्टर म्हणून काम करणाऱ्या, एका 32 वर्षीय महिला डॉक्टरला, त्याच केंद्रात वरिष्ठ म्हणून काम करणाऱ्या डॉक्टरने शरीरसुखाची मागणी केली. ही संतापजनक घटना बीडच्या अंबाजोगाई शहरालगत असणाऱ्या वाघाळा येथील नवजीवन व्यसनमुक्ती केंद्रात घडली आहे. विशेष म्हणजे केंद्राच्या संचालकीसह तिथं काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर पीडितेने गंभीर आरोप केले आहेत. या व्यसनमुक्ती केंद्रात इतर मुलींना देखील त्रास असून मुदत संपलेली औषधे रुग्णांना दिली जात असल्याचं पीडितेने म्हटलं आहे.

    Ads by 

    पीडितेने अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून 32 वर्षीय तक्रारदार पीडिता या नवजीवन व्यसनमुक्ती केंद्रात निवासी वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत होत्या. यादरम्यान वरिष्ठ डॉक्टर म्हणून कार्यरत असणाऱ्या राजकुमार गवळे हे सतत पीडित महिला डॉक्टरच्या कामांमध्ये चूक काढत मानसिक त्रास देत असत. यादरम्यान ड्युटीवर असताना डॉ. गवळे यांनी पीडिता महिला डॉक्टरकडे शरीरसुखाची मागणी केली. यावेळी पीडितेने नकार दिल्याने त्यांना इंजेक्शन देऊन बेशुद्ध केलं. त्यांनतर चुकीचे औषधोपचार करून मानसिक रुग्ण देखील करण्याचा प्रयत्न केला गेला.

    विशेष म्हणजे हे सगळं करत असताना नवजीवन व्यसनमुक्ती केंद्राच्या संचालिका अंजली पाटील यांच्यासह कर्मचारी म्हणून काम करणारा ओम डोलारे हा देखील शारीरिक आणि मानसिक त्रास देत असल्याचं देखील पीडितेने म्हटलं आहे. त्याचबरोबर आरोपी ओम डोलारे हा रुग्णांना मुदत संपलेली औषधे देत असल्याचंही पीडितेने म्हटलं आहे.


    याप्रकरणी पीडितेच्या अशा स्वरूपाच्या फिर्यादीवरून अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्यात आरोपी डॉ. राजकुमार गवळे, केंद्र संचालिका अंजली पाटील, कर्मचारी ओम डोलारे या तिघांवर कलम 354-A, 504, 506, 34 यासह ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान या उघडकीस आलेल्या धक्कादायक प्रकाराने अंबाजोगाईसह जिल्ह्यात संताप व्यक्त केला जात असून आरोपींवर कठोर कारवाई करा. अशी मागणी केली जात आहे.

    Post a Comment

    0 Comments