-->

Ads

Budget 2023 LIVE UPDATES : बजेटमधून गुडन्यूज! टॅक्स स्लॅबमध्ये मोठे बदल, पाहा नवे अपडेट्स

 

Budget 2023 Speech Live Updates : खुशखबर! अर्थमंत्री निर्मला सीतारामन बजेट सादर करत केलं, यामध्ये कर प्रणालीमध्ये मोठे बदल करण्यात आला आहे. त्यामुळे सर्वसामान्य लोकांना मोठा दिलासा मिळाला आहे. हे नवे बदल 2024 च्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जरी असले तरी हा मोठा दिलासा आहे. तब्बल 8 वर्षांनंतर टॅक्स स्लॅबमध्ये दिसाला मिळाला आहे.



12:24 (IST)

आयकर
मध्यमवर्गीयांसाठी खूशखबर


रिबेट सीमा 7 लाख रुपयांपर्यंत वाढवली
७ लाखांपर्यंत कोणालाही कर भरावा लागणार नाही 

12:19 (IST)

काय स्वस्त काय महाग?

टीव्ही स्वस्त होणार

विदेशी किचन चिमण्या महागणार

सोनं चांदी महाग होणार

12:18 (IST)

काय स्वस्त काय महाग?

टीव्ही स्वस्त होणार

विदेशी किचन चिमण्या महागणार

सोनं चांदी महाग होणार

12:14 (IST)

काय स्वस्त काय महाग?

चांदीचे दागिने महाग होणार
मोबाईल स्वस्त होणार
आयात शुल्क कमी करण्याचा सरकारचा निर्णय
कॅमेरा लेन्स स्वस्त होणार

12:7 (IST)

क्रेडिट रिव्हॅम्प स्कीमसाठी ९ हजार कोटींची तरतूद!


छोट्या व मध्यम उद्योगांसाठी जाहीर करण्यात आलेली क्रेडिट रिव्हॅम्प स्कीम १ एप्रिलपासून अंमलात येणार असून त्यासाठी ९ हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. त्याचा २ लाख कोटींच्या मोफत क्रेडिट गॅरंटी मिळण्यात फायदा होईल – केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण

12:7 (IST)

मेक एआय इन इंडिया आणि मेक एआय वर्क फॉर इंडियाला चालना देण्यासाठी, आर्टिफिशियल इंटेलिजन्सची तीन केंद्रे स्थापन केली जातील.

देशातील तीन प्रमुख संस्थांमध्ये हे केंद्र स्थापन केले जाणार जाणार

12:7 (IST)

युवकांना प्रशिक्षणासाठी ३३ स्किल डेव्हलपमेंट सेंटर्सची उभारणी


प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना ४.० पुढच्या तीन वर्षांत लाँच केली जाईल. नोकरीवरच प्रशिक्षण, व्यावसायिक भागीदारी यासह नव्या व्यावसायिक गरजांनुसार युवकांचे कौशल्य विकसित करण्यावर भर देण्यात येईल. त्यासाठी विविध राज्यांमध्ये ३३ स्किल डेव्हलपमेंट सेंटर्सची उभारणी करण्यात येईल – केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण

12:6 (IST)

राज्य सरकारांना 15 वर्षांसाठी बिनव्याजी कर्ज दिले आहे.त्याची मुदत आणखी एक वर्षासाठी वाढवली ​​जाणार

12:6 (IST)


पुढच्या तीन वर्षांत सरकार १ कोटी शेतकऱ्यांना नैसर्गिक शेती करण्यासाठी प्रोत्साहन देईल.

यासाठी १० हजार बायो इनपुट रिसोर्स सेंटर्सची स्थापना केली जाईल – केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण

12:6 (IST)

हरित ऊर्जा क्षेत्रासाठी ३५ हजार कोटींची तरतूद!


पर्यावरणपूरक लाईफस्टाईलला प्रोत्साहन देण्यासाठी हरित विकासावर भर देण्यात आला आहे. नॅशनल ग्रीन हायड्रोजन मिशनसाठी नुकतीत ९७०० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. कार्बनचं उत्सर्जन कमी करण्यासाठी याचा मोठा फायदा होणार. या अर्थसंकल्पात ३५००० कोटींची भांडवली तरतूद हरित ऊर्जा क्षेत्रासाठी करण्यात आली आह – केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण

Post a Comment

0 Comments