-->

Ads

रात्रीस खेळ चाले! पुण्यात चितेसोबत तृतीयपंथीयांचे आघोरी कृत्य; पोलिसांनी रंगेहाथ पकडलं

 पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत शुक्रवारी मध्यरात्री अडीच वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला आहे.




    पुणे, 23 डिसेंबर, चंद्रकांत फुंदे  :  पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत शुक्रवारी मध्यरात्री अडीच वाजण्याच्या सुमारास दोन तृतीयपंथी चितेजवळ जादूटोणा करताना पकडले गेले आहेत. या घटनेमुळे खळबळ उडाली असून, नागरीकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. पोलिसांनी या दोनही तृतीयपंथींना अटक केली आहे. या घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

    चितेसमोर आघोरी पूजा 

    घटनेबाबत अधिक माहिती अशी की,  पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत शुक्रवारी मध्यरात्री अडीच वाजण्याच्या सुमारास दोन तृतीयपंथी चितेजवळ जादूटोणा करताना पकडले गेले आहेत. या प्रकारानं खळबळ उडाली आहे. लक्ष्मी निबाजी शिंदे आणि मनोज अशोक धुमाळ अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं आहे. वैकुंठ स्मशानभूमीत रात्री एक वाजण्याच्या सुमारास एका मृतदेहावर अत्यंसस्कार करण्यात आले. त्यानंतर  काही तासांनी  लक्ष्मी निबाजी शिंदे आणि मनोज अशोक धुमाळ हे त्या ठिकाणी आले. त्यानंतर त्यांनी आपल्यासोबत आणलेल्या काळ्या रंगाच्या बाहुल्या, काही लोकांचे फोटो, लिंबू, सूया आणि हळदी कुंकू असे साहित्य चितेसमोर मांडले आणि आघोरी पुजेला सुरुवात केली.

    मात्र ही घटना स्मशानभूमीमधील एका कर्मचाऱ्याने पाहिली. त्यानंतर त्याने याबाबत पोलिसांना कळवले. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपींना रंगेहाथ पकडले. या प्रकरणात दोन्ही आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.  पुण्यात मात्र या घटनेनं खळबळ उडाली असून, हा चर्चेचा विषय बनला आहे.

    Post a Comment

    0 Comments