प्रतिनिधी ज्ञानेश्वर मेटकर
पुसद : पुसद तालुका ग्राहक संरक्षण संस्थेच्या वतीने विद्यार्थिनींना स्वेटर चे वाटप करण्यात आले. ग्राहक संरक्षण संस्थेचे महाराष्ट्र प्रदेश महासचिव सुरेश भाऊ सिडाम यांच्या संकल्पनेतून थंडीचे दिवस असल्याकारणाने शिकणाऱ्या दहावी व बारावीतील विद्यार्थिनींना सहकार्य म्हणून ग्राहक संरक्षण संस्थेच्या वतीने स्वेटर चे वाटप करण्यात आले. पुसद येथील शासकीय विश्रामगृहावर आज दिनांक 25/12/22 रोजी आयोजित कार्यक्रमांमध्ये कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. डॉ. लोकनेत्या सौ. आरती ताई फुपाटे माजी जिल्हा परिषद अध्यक्षा तथा विदर्भ महासचिव अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद तर प्रमुख पाहुणे आत्मारामजी धाबे प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालय पुसद. त्याचबरोबर यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा काकडदातीचे व्यवस्थापक कृष्णराव पाटील तसेच माजी उपशिक्षणाधिकारी माननीय विश्वनाथ इडपाते, संभाजीराव इंगोले, सचिन आत्राम, सुधाकर तुमडाम
ॲड. मंगेश येवले, प्रशांत भाऊ कुटुरुवार, विजय गव्हाणे, प्रकाश भाऊ ठाकरे, विलासराव फलटणकर, सुभाष पाचकोरे, पुंडलिकराव फलटणकर, दिलीप वावधाने, सुभाष बुरकुले, स्वप्निल इंगळे, रमेश बुरकुले, महिला आघाडीच्या तालुका अध्यक्षा माया कथळकर, तालुका उपाध्यक्षा सुनीता ठाकरे, जया फलटणकर, संध्या बुटलेकर व अलका देवकते या सर्व कार्यकर्त्यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमामध्ये ग्रामीण भागातील 25 विद्यार्थिनींना स्वेटर चे वाटप करण्यात आले व फराळाची व्यवस्था करून सर्व विद्यार्थिनींचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमांमध्ये प्रमुख पाहुणे म्हणून आपले विचार व्यक्त करताना आत्माराम जी धाबे साहेब यांनी बाजारामध्ये मिळणाऱ्या प्रत्येक वस्तूचे सर्वात आधी, "EXPIRY DATE" कालबाह्यता तारीख आपण सर्वांनी पाहिली पाहिजे. आपण त्यावर असलेल्या किमती पाहून त्याचे भाव केले पाहिजे व बाजारात आपली फसवणूक होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. जर आपली फसवणूक झाली
तर ग्राहक संरक्षण संस्थेच्या माध्यमातून तहसीलदार साहेब यांच्याकडे फसवणूक करणाऱ्या दुकानदाराच्या विरोधामध्ये तक्रार दाखल होते असे महत्त्वाचे आपल्या मनोगतातून त्यांनी व्यक्त केले. त्याचबरोबर कार्यक्रमाचे अध्यक्ष आरती ताई फुकाटे यांनी उपस्थित विद्यार्थिनींना अतिशय मोलाचे व जीवनातील समोर वाटचालीसाठी निर्भीडपणाने जीवन जगावे व जीवनामध्ये काहीतरी ध्येय ठेवून समोर गेले पाहिजे बारा-बारा तास अभ्यास करून आपण डॉक्टर, वकील, इंजिनिअर, वैज्ञानिक, जिल्हाधिकारी बनण्याचे स्वप्न उराशी बाळगले पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माजी राष्ट्रपती ए. पी. जे. अब्दुल कलाम यांनी अतिशय अनुकूल परिस्थिती मध्ये शिक्षण घेऊन जगाच्या समोर आदर्श निर्माण केला त्यांची प्रेरणा घेऊन आपण जीवनामध्ये ध्येय गाठण्याचा निश्चय केला पाहिजे. सावित्रीबाई फुले यांनी विरोधकांकडून शेण, माती अंगावर घेऊन तुमच्या आमच्यासाठी शिक्षणाची दारे खुली केली आहेत त्याचा आपण सर्वतोपरी लाभ घेऊन जीवनामध्ये सफल होण्यासाठी फक्त आणि फक्त अभ्यासच केला पाहिजे जीवनामध्ये तीळ मात्र ध्येयापासून ढळून न जाता
आपण आपले ध्येय गाठण्यासाठी अभ्यासरूपी कष्ट केले पाहिजे. मी एक डॉक्टर असल्यामुळे माझ्याकडून ज्या मार्गदर्शनाचे आवश्यकता असेल ते मार्गदर्शन करण्यासाठी मी तयार आहे केव्हाही कधीही तुम्हाला गरज वाटल्यास बिनधास्त माझ्याशी संपर्क साधा, मला भेटा असे सुद्धा त्यांनी आवर्जून या विद्यार्थिनींना आवाहन केले व आपल्या पायावर उभ्या राहाव्यात यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे असे त्यांनी अध्यक्षीय भाषणात मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे संचालन राजेश पांडे सर सहाय्यक शिक्षक स्वर्गीय बाबासाहेब नाईक माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय पारवा यांनी केले. प्रस्ताविक बाबाराव उबाळे यांनी केले. ग्राहक संरक्षण संस्थेचे महाराष्ट्र प्रदेश महासचिव सुरेश भाऊ सिडाम यांनी सुद्धा आपले मनोगत व्यक्त केले व आपण समाजाचे काही देणे लागते या उदात हेतूने आम्ही या कार्यक्रमाचा आयोजन करत असतो व दरवर्षी काही ना काही कार्यक्रमाचे आम्ही आयोजन करत असतो या कार्यक्रमाला आलेल्या सर्व मान्यवरांचे त्यांनी आवर्जून आभार मानले तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन विश्वनाथ ईडपाते माजी उपशिक्षणाधिकारी यांनी केले या कार्यक्रमाला समाजातील मोठ्या संख्येने सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार उपस्थित होते.
0 Comments