-->

Ads

आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांस आमदार ससाने यांनी दिली सात्वनपर भेट.


उमरखेड प्रतिनिधी:-  संजय जाधव                      

 दि २९ ऑगस्ट रोजी उमरखेड तालुक्यातील निंगणुर येथील हिरामननगर येथील शेतकरी चंपत नारायण जंगले यांनी कर्जबाजारी  व सततच्या नापिकीला कंटाळून कधी कोरडा दुष्काळ तर कधी ओला दुष्काळ या विवंचनेत आत्महत्या केली होती. त्या आत्महत्याग्रस्त कुटुंबाला आमदार नामदेवराव ससाने यांनी भेट देऊन झालेल्या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त करीत सदर आत्महत्या ग्रस्त शेतकरी कुटुंबाला शासनाकडून आर्थिक मदत देण्यात यावी. आशा सूचना उपस्थित नायब तहसीलदार पाईकराव साहेब व मंडळ अधिकारी फटाले यांना केल्या. तसेच कुटुंब अर्थ साहाय्य व विधवा निराधार योजने अंतर्गत पीडित कुटुंबियांना लाभ देण्याच्या संदर्भाने सूचना केल्या. याप्रसंगी  विवेकानंद पाटील नलावडे, गोकुळ राठोड,मनोज जाधव मेट ,मारोती गव्हाळे, गजानन नावडे,सचिन पंडागळे,अनुप शेखावत,राज शिरगिरे, नरेंद्र अवधूत, विश्वभर भोंगाळे, विजय भोरकडे व आदी ग्रामस्थ उपस्थित होते.



Post a Comment

0 Comments