गावकर्यांनी तहसीलदार यांना निवेदनाव्दारे दिला उपोषणाचा इशारा
पुसद ता./प्रतिनिधी ज्ञानेश्र्वर मेटकर 3D न्यूज पुसद
पुसदःमौजा बोररगडी येथिल शेत स.नं.३५ एफ क्लास सरकार स्मशानभुमीच्या जमिनीवर केलेले अतिक्रमणत त्वरीत हटविणे यावे याविषयी तहसिलदार यांना बोरगडी येथिल नागरिकांनी निवेदन देऊन मागणी केली
सदर तक्रार निवेदनात म्हटले की, मौजा बोरगडी येथील शेत सर्वे नंबर ३५ असून ५७ आर.ही जमीन एफ क्लास सरकार स्मशान भूमी या नावाने सात बारा असून एका शेतकऱ्याने यावर ताबा करून या शेताची वहिती करीत असलेली जमीन शेतकन्याची नसून ती जमीन स्मशान एफ क्लास सरकार या नावाने असून हया जमिनीवर शेतकन्याचा ताबा हटविण्यात यावा. स्मशान भूमी ची जमीन असून बोरगडी येथील नागरिकांना स्मशान भूमी अभावी नाल्याच्या काठावर उघड्यावर अंत्यसंस्कार पार पाडावे लागते. पंधराशे लोकांची वस्ती असलेल्या गावात स्वातंत्र्याच्या ७५ व्या अमृत महोत्सव वर्षात ही सारख्या समशान भूमी जागा असून दुसऱ्याच्या ताबा असल्याने हया जागे अभावी शेड नसल्याने उघड्यावर अंतिम संस्कार करण्याची वेळ येते. ही खेदाची बाब आहे.
या पूर्वी शासनाने निधी उपलब केला होता पंरतू जागे अभावी निधी परत गोल. तसेच ग्रामपंचायत सदस्य शरद ढेबरे यांनी ग्रामपंचायत सरपंच/ सचिव यांना लेखी निवेदन व ग्राम सभेत ठरावं घेऊन ग्राम पंचायतीने मोजणी साठी अर्ज करून मोजणी फी भरून मोजणी झाली. भूमी अभिलेख कार्यालय मोजणी सीट देण्यासाठी टाळाटाळ करत आहे.
या वरील सर्व विषयाचा चौकशी करून दोन ऑक्टोंबर पूर्वी जमिनीचा ताबा ग्रामपंचायत चा ताब्यात देण्यात यावी असे न झाल्यास खालील साह्य करणारे नाल्याच्या काठावर ज्या ठिकाणी अंतिम संस्कार करतात त्या ठिकाणी उपोषण करण्यात येईल असा इशारा निवेदनातुन केला आहे. या निवेदनावर शरद ढेंबरे, दादाराव फुलाते, राजेश चंदन ढोले, मोतीराम पाईकराव तसेच अनेक गावकरी लोकांच्या सह्या आहे.
0 Comments