-->

Ads

अखिल भारतीय विज्ञान मेळाव्यात पोदार स्कूलच्या विद्यार्थिनीने पटकाविला प्रथम क्रमांक



शिक्षण विभागाद्वारे आयोजित अखिल भारतीय विद्यार्थी विज्ञान मेळावा 2022 ची तालुकास्तरीय आयोजन पुसद येथे करण्यात आले आहे त्यातील विज्ञान मेळावा वक्तृत्व स्पर्धा हाजी अख्तर नगरपरिषद हायस्कूल व जुनिअर कॉलेज या ठिकाणी पार पडली यामध्ये विद्यालंकार्स पोदार  लर्न स्कूल पुसदच्या कु.आयुष्मा अमित बोजेवार यांनी प्रथम क्रमांक पटकाविला. या स्पर्धेत एकूण 20 शाळांनी सहभाग घेतला होता विद्यार्थ्यांना विविध विषयांचे पर्याय देण्यात आले होते व कु. आयुष्माने बेसिक सायन्स फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंट या विषयावर अतिशय उत्कृष्ट सादरीकरण केले. प्रस्तुती करण, भाषणाचा ओघ, प्रश्नांना उत्तरे देण्याची क्षमता, नाविन्यपूर्ण दृकश्रवण साहित्यांचा वापर या सर्व निकषांवर तिची निवड करण्यात आली. स्पर्धेचे पंच व उपस्थित सर्वांनी तिच्या सादरीकरणाची प्रशंसा केली. विद्यालंकार्स पोदार लर्न स्कूल मधील स्पर्धा पूर्ण  वातावरणामुळे विद्यार्थी विविध स्पर्धांमध्ये सहभाग घेण्यास प्रोत्साहित होतात. अभ्यासक्रमात संदर्भातील असो अथवा खेळांमधील असो सर्व स्पर्धांमध्ये पोदार स्कूल मधील विद्यार्थ्यांचा आलेख वाढताच राहिला आहे. कु.आयुष्मानि मिळविलेल्या यशाबद्दल पोदार स्कूलचे संचालक श्री शरद मैंद, श्री सुरज डुबेवार, श्री संतोष अग्रवाल, श्री मनीष अनंतवार, श्री संगमनाथ सोमावार यांनी तिचे व तिच्या पालकांचे हार्दिक अभिनंदन केले. तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.अनुपमा भट देशमुख यांनी आयुष्माचा सर्व विद्यार्थ्यांसमोर समोर सत्कार केला...

Post a Comment

0 Comments