-->

Ads

विद्यार्थी बनले शिक्षक अन् रंगला खडू - फळा ; जनता शिक्षण प्रसारक मंडळ विद्यालयात शिक्षक दिन सोहळा !

पुसद , : वर्गातील शिक्षकांकडून प्रेरणा घेत शिक्षक दिनानिमित्त आयोजित ' स्वयंशासन विद्यालय ' उपक्रमात शालेय विद्यार्थ्यांनी शिक्षकाच्या नव्या भूमिकेत सुंदर अध्यापनाने शाळा गाजवली.खडू फळ्याचा वापर करत विद्यार्थ्यांना अभ्यासाचे धडे दिले . विद्यार्थीच शिक्षक बनल्याने शिक्षक - विद्यार्थी नात्याचा वेगळा अनुभव या उपक्रमात पहावयास मिळाला .


 प्रतिनिधी :  ज्ञानेश्वर मेटकर

3D न्यूज पुसद

येथील जनता शिक्षण प्रसारक मंडळ विद्यालयात मुख्याध्यापक डॉ . माधवी गुल्हाने यांच्या मार्गदर्शना राबविण्यात आलेल्या स्वयंशासन उपक्रमाला मोठा प्रतिसाद मिळाला . वेळापत्रकाच्या नियोजनानुसार काही इच्छुक विद्यार्थ्यांनी शिक्षकांची भूमिका वठवली . विशेषतः मुलींनी साड्या परिधान करून अध्यापनातून ‘ क्लासरूम ’ गाजवली . या नाविन्यपूर्ण उपक्रमात शिक्षकांची भूमिका सादर करण्यासाठी अध्यापनाची पूर्वतयारी केली.काहींनी आपल्या शैलीत बहारदार अध्यापन केले.काहींनी खडू फळ्याचा वापर करीत कठीण गणिते सोप्या पद्धतीने सोडविली व विद्यार्थ्यांच्या मनातील गणित विषयाची भीती दूर सारली . तर काहींनी इंग्रजी भाषा विषय अस्खलित इंग्रजीचा वापर करत सुंदररित्या शिकविला . या विद्यार्थी शिक्षकांनी अध्यापनात प्राण ओतला तर काहींनी आपल्या अध्यापन शैलीने विद्यार्थ्यांना प्रभावित केले व टवाळखोर विद्यार्थ्यांची बोलती बंद केली . एकूणच प्रचंड उत्साह शिक्षक - विद्यार्थी यांच्यात दिसून आला . या उपक्रमाच्या सुरुवातीला माजी राष्ट्रपती डॉ . सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून विद्यार्थ्यांनी शिक्षक दिनानिमित्त अभिवादन केले . शिक्षक हा आपल्या उत्कृष्ट अध्यापन शैलीतून विद्यार्थ्यांच्या मनावर राज्य करतो.विद्यार्थी शिक्षकांकडून प्रेरणा घेतो व भावी आयुष्यात यश मिळविण्यासाठी धडपडतो . शिक्षकही आधी विद्यार्थी असतो . विषयात रंग भरण्यासाठी शिक्षक स्वतः अभ्यास करतो , त्यामुळे विद्यार्थ्यांनी स्वयंशासन उपक्रमातून अध्ययन व अध्यापनासाठी प्रेरणा घ्यावी , असे विचार मुख्याध्यापक डॉ . माधवी गुल्हाने यांनी व्यक्त केले . जो विषयात रंग भरतो , विद्यार्थ्यांना शिकवताना रंगून जातो , अध्यापनाचा खराखुरा आनंद घेतो , तो शिक्षक विद्यार्थ्यांनाही आवडतो . अध्यापनात खडू आणि फळ असे फक्त काळा , पांढरा दोन रंग वापरून विद्यार्थ्यांचे जीवन रंगीत बनवतो , त्यामुळे शिक्षकांचे कार्य विद्यार्थ्यांनी समजून घ्यावे , त्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा , असे आवाहन डॉ . माधवी गुल्हाने यांनी केले . या उपक्रमात डिंपल राठोड , ममता वाकोडकर , आदिती स्वामी , अनुराधा गादेकर , वेदिका चव्हाण , आदित्य गोफणे , पुजा जाधव , खांडवडे , वैष्णवी पद्मगीरवर , श्रावणी चव्हाण , 


धर्मवीर जाधव , दिव्यानी चव्हाण , ठमके , डॉली खिल्लारे , आकांक्षा झोडगे , राखी इंगळे , शिवानी मुळे , अक्षरा आडे , गुणेश्वरी राठोड , श्रुती राठोड , धनश्री राठोड , आदर्श पवार , प्राची मांडवगडे , तेजस्विनी राठोड , साक्षी गावंडे , आरती जगताप , सायली स्वामी रोहित राठोड , अस्मिता गारडे , ओमकार राठोड , पायल सुरोशे , दीक्षा चव्हाण , संजना चव्हाण , संतोषी वंजारे , रेखा तडसे , निकिता सुपले , श्रुती गावंडे , वैष्णवी कोकडे , स्वाती चव्हाण , पूनम चव्हाण , श्रुती गावंडे , स्वाती चव्हाण यांनी सहभाग घेतला . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वाती चव्हाण यांनी केले तर पूनम चव्हाण यांनी आभार मानले . या कार्यक्रमाला शिक्षक दिगंबर लोहटे , आडे , कोडापे , भगतयांचे मार्गदर्शन लाभले .

Post a Comment

0 Comments