-->

Ads

अंबरनाथच्या खुंटवली खामकरवाडी परिसरात आदिवासी गौरव दिन साजरा

माजी नगराध्यक्षा मनीषा वाळेकर यांच्या हस्ते बिरसा मुंडा व राघोजी भांगरे यांना आदरांजली









अंबरनाथ पश्चिमेकडील खामकरवाडी चौक येथे जागतिक आदिवासी दिन साजरा करण्यात आला. पश्चिमेकडील खुंटवली, खामकरवाडी या परिसरामध्ये आदिवासी समाज मोठ्या प्रमाणात राहतो. सालाबाद प्रमाणे यंदाही 9 ऑगस्ट रोजी जागतिक आदिवासी दिवस साजरा केला. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून 





अंबरनाथच्या माजी नगराध्यक्षा मनीषा अरविंद वाळेकर उपस्थित होत्या, त्यांनी बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला व आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांची जयंती निमित्त त्यांना पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. 


         खामकरवाडी चौक ते तहसीलदार कार्यालयापर्यंत आदिवासी बांधवांनी रॅलीचे आयोजन केले होते यामध्ये पालघर, वाडा, मोखाडा विभागातील आदिवासी बांधवांनी आपले कला नृत्य सादर केले. याप्रसंगी माजी नगरसेवक निखिल वाळेकर, बदलापूरच्या माजी नगरसेविका सौ. गवारी, आदिवासी समाजाचे राजाराम लोटे, प्रकाश घिगे, विठ्ठल टीपे, श्री. तीटकारे, डामसे, आसवले आदी उपस्थित होते.





3D  न्यूज,

उस्मान शाह, अंबरनाथ

Post a Comment

0 Comments