-->

Ads

अंबरनाथमधील तरुणाच्या हत्येचे गूढ पोलिसांनी उकलले | दोन अटकेत तर तिघांचा शोध घेण्यासाठी पथक यूपीला रवाना


            

उस्मान शाह, अंबरनाथ

तरुणाचा खून करून मृतदेह गोणीत गुंडाळून, दगडाला बांधून अंबरनाथच्या जावसई गावातील तलावात फेकणाऱ्या दोन आरोपींना अंबरनाथ पोलिसांनी अटक केली आहे. तर यातील तीन आरोपी फरार आहेत. या तीन आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांची दोन पथके उत्तर प्रदेशला रवाना झाली आहेत. अशी माहिती सहायक पोलिस आयुक्त जगदीश सातव आणि वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र कोते यांनी बुधवारी पत्रकारांना दिली. या खुनाच्या गुन्ह्यात पोलिसांच्या हाती कोणताही सुगावा न लागता पोलिसांनी या खून प्रकरणाची उकल केली आहे. रोशन साहनी असे या हत्याकांडात पकडलेल्या आरोपीचे नाव असून एका आरोपी अल्पवयीन आहे. तसेच सचिन चौहान, अजय जयस्वार आणि समीर सिद्दीकी उर्फ ​​छोटा बाबू अशी फरार आरोपींची नावे आहेत.


        4 ऑगस्ट रोजी उल्हासनगर येथील विशाल राजभर (20) याचा मृतदेह जावसईच्या तलावातून बाहेर काढण्यात आला होता.  डोक्यावर, गळ्यावर वार करून खून करून मृतदेह गोणीत गुंडाळून तलावात फेकून दिला होता. पोलिसांनी तपास सुरू केला असता, मृतक विशाल नवीन वस्ती परिसरात दादागिरी करत असल्याचे समोर आले. त्यानी दगडफेक करून येथील विद्युत डीपी फोडली, त्यामुळे परिसराचे दिवे गेले.  त्यामुळे येथील नागरिकांमध्ये त्याच्याविरोधात रोष निर्माण झाला होता.  पोलिसांनी सर्वप्रथम सूरज यादवला विचारणा केली असता चौकशीत त्यानी सांगितले की, मृत विशाल उर्फ ​​टाकल्या राजभर याची सचिन चौहान व त्याच्या साथीदारांनी हत्या करून तलावात फेकून दिले.  रोशन साहनी याने त्याला ही गोष्ट सांगितली. पोलिसांनी रोशन साहनी याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता, मयत विशालने सचिन चव्हाण याला चापट मारल्याचे त्याने सांगितले. त्याचा राग आल्याने चौघा आरोपींनी विशालचा आयुध कारखाना परिसरातील बंद खोलीत लोखंडी रॉडने डोक्यात, मानेवर, हातावर व पायावर वार करून त्याचा खून केला आणि मृतदेह तलावात फेकून दिला. पोलीस उपायुक्तांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक कोते व त्यांच्या संपूर्ण पथकाने ६ दिवसांत खुनाचे गूढ उकलले आहे.



Post a Comment

0 Comments