-->

Ads

अपघात होवु नये म्हणुन वाहतुकीचे नियम पाळा निरीक्षक ज्ञानेश्वर चव्हाण : जनता शिक्षण प्रसारक मंडळ विद्यालयात मार्गदर्शन


पुसद : शालेय विद्यार्थी दुचाकी वाहन भरधाव चालवतात . वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवतात . त्यामुळे अपघाताला निमंत्रण मिळते.खरे पहिले तर वाहन हे यंत्र आहे . त्यावर नियंत्रण ठेवा . अपघात होऊ नये म्हणून वाहतुकीचे नियम पाळा असे आवाहन पुसद येथील वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर चव्हाण यांनी केले . जनता शिक्षण प्रसारक मंडळ विद्यालयात ' वाहतूक सुरक्षा ' या विषयावर मार्गदर्शन करताना श्री . चव्हाण बोलत होते . कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या मुख्याध्यापक डॉ . माधवी दिनकर गुल्हाने होत्या . यावेळी व्यासपीठावर वाहतूक सुरक्षा विभागाचे वडते व गजभार यांची प्रमुख उपस्थिती होती . यावेळी श्री ज्ञानेश्वर चव्हाण यांच्या हस्ते शाळेची वाहतूक सुरक्षा समिती घोषित करण्यात आली.या समितीच्या वतीने विद्यार्थ्यांना शाळेत ने - आण करणाऱ्या ऑटो रिक्षा व इतर वाहन चालकांचे मोबाईल क्रमांक तसेच गाडी क्रमांक नोंदविण्यात आले आहेत . 




या व्यवस्थेबद्दल श्री . चव्हाण यांनी वाहतूक समितीचे कौतुक केले . सुरुवातीला श्री . चव्हाण यांचे शाळेच्या वतीनेशाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला . पुढे मार्गदर्शन करताना चव्हाण म्हणाले की , वाहन चालवताना वाहतुकीचे नियम काटेकोरपणे पाळावे , वाहन चालवताना मोबाईल फोनचा वापर करू नये , वाहन वेगावर नियंत्रण ठेवावे . वाहन चालविण्यासाठी परवाना आवश्यक आहे .अन्यथा दंडात्मक कारवाई करण्यात येईल , अशी सूचना त्यांनी दिली.विद्यार्थी जीवनात ध्येय गाठण्यासाठी विद्यार्थ्यांनी मेहनत करावी , असा मौलिक सल्ला त्यांनी यावेळी दिला . अध्यक्ष भाषणात डॉ . माधवी गुल्हाने म्हणाल्या की , शाळा ही संस्कार केंद्र आहे.यात मुलांना घडविण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येतात.शाळे द्वारा विविध समित्यांचे गठन करण्यात आले आहे . त्यातील वाहतूक समिती ही महत्त्वपूर्ण असून विद्यार्थ्यांनी वाहतुकीच्या नियमांचे पालन केले पाहिजे , त्याद्वारे अपघाताचे प्रमाण कमी करता येईल , असे त्यांनी सांगितले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिगंबर लोहटे यांनी केले तर आभार आडे यांनी मानले . कार्यक्रमाला शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते .

Post a Comment

0 Comments