-->

Ads

शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांसह शेतमजुरांचा सन्मान

प्रहार जनशक्ती पक्षातर्फे बच्चू कडु यांच्या वाढदिवस अनेक सामाजिक उपक्रमातून साजरा प्रतिनिधी उमरखेड:संजय जाधव

 काल दि. 5 जुलै रोजी महाराष्ट्र राज्याचे मा. राज्यमंत्री बच्चू कडु यांच्या वाढदिवसा निमित्त उमरखेड  शहर व तालुक्यात अनेक सामाजिक उपक्रम राबवत प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने साजरा करण्यात आला.प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष, महाराष्ट्र राज्याचे माजी राज्यमंत्री बच्चू कडु यांच्या वाढदिवसा निमित्त उमरखेड शहरात व तालुक्यात वृक्षारोपण करून कार्यक्रमास सुरवात करण्यात आली, तसेच चातारी येथील  जगाचा पोशिंदा म्हणून ज्याला ओळखले जाते अशा शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शाल, टोपी देवुन कष्टकरी शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आला.या मध्ये माजी सैनिक यांनी प्रथम देश सेवा करून सेवानिवृत्त होऊन आल्यावर गावाकडे असलेली शेत प्रगतशील पद्धतीने करून एक वेगळी ओळख  निर्माण करणारे  विलास पवार, यांच्यासह शून्यातुन शेती मध्ये दिवस रात्र मेहनत घेत सकाळ पासून ते रात्री पर्यंत पती पत्नी मिळून शेतीत मेहनत घेत असणारे कैलास शिंदे तसेच अहोरात्र मेहनत घेऊन उत्तम प्रकारे शेती पिक घेऊन गाव सह तालुक्यात वेगळी छाप सोडत कमी रानात जास्त उत्पन्न घेणारे विश्वास माने यांचा सत्कार करण्यात, दुसऱ्यांच्या शेतात राबराब राबून आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करणाऱ्या शेतमजूर भगिनींचा सुद्धा  शेताच्या बांधावर जाऊन त्यांचा सत्कार  प्रहार जनशक्ती पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आला.


          तसेच प्रहारसेवक चातारी येथील रहिवासी बंडू हामंद  यांनी स्वखर्चाने समाजहिताचे, लोकोपयोगासाठी गावातील नागरिकांना ऐ -जा करण्यासाठी रस्ता तयार केला याबद्दल त्यांचे सुद्धा बच्चू कडू यांच्या वाढदिवसानिमित्त सत्कार करण्यात आला. यावेळी प्रहार शेतकरी संघटनेचे यवतमाळ जिल्हा अध्यक्ष अनिल माने, प्रहार सेवक बंडु हामंद, प्रहार जनशक्ती पक्षाचे उमरखेड तालुका प्रमुख सय्यद माजीद, तालुका संपर्कप्रमुख अंकुश पानपट्टे, उमरखेड शहर प्रमुख राहुल मोहितवार, तालुका संघटक आशिष हामंद, राम हामंद, प्रहार विद्यार्थी आघाडी शहर प्रमुख सावन हिंगमिरे, प्रसिद्धी प्रमुख विवेक जळके, प्रविण इंगळे व  इतरही कार्यकर्ते हजर होते.

Post a Comment

0 Comments